कागल येथे ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने वृध्द ठार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कागल तालुक्यातील मुरगुड नाका येथे रहात असलेल्या विलास रतन शहा (वय 88) हे शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांच्या  दुचाकीस शासकीय धान्य घेऊन जात असलेल्या ट्रकने ओव्हर ट्रेक करत  धडक दिल्याने ते ट्रकच्या मागील चाकात पडल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक जाऊन  त्यांचा  जागीच मृत्यू झाला.या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,कागल येथील उद्योजक संजय शहा ,समीर शहा आणि रतन शहा हे तिघे भाऊ मुरगुड नाका परिसरात रहात असून त्यांचे वडील विलास रतन शहा हे आपल्या टीव्हीएस फिफ्टी या मोटारसायकल वरुन सकाळच्या सुमारास कागल गावात कामा निमित्त आले होते.काम आटोपून देवदर्शन घेऊन परत जात असताना पाठीमागून येत असलेला शासकीय ट्रक धान्य घेऊन मुरगुडला चाललेल्या ट्रकने शहा यांच्या मोटारसायकलला ओव्हर टेक करून पुढ़े जात असताना जोराची धडक दिल्याने ते खाली पडून ट्रकच्या मागील चाक  डोक्यावरून गेल्याने शहा यांचा जागीच मृत्यू झाला.

या झालेल्या अपघाताने मोठा आवाज झाल्याने नगारजी यांच्या घरातली माणसं घटना स्थळी येऊन अपघाताची घटना नजरेस पडल्याने सदरचा ट्रक अडवून या अपघाताची माहिती कागल पोलिसांना दिली.कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह पोलिस कर्मचारी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेऊन ट्रक ड्रायव्हर अनिल रामू भोसले (टेंबलाईवाडी ) याला ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post