प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार पंढ़रीनाथ सावंत (वय 42.रा.महालक्ष्मीनगर ,कंळबा ) यांच्या पायाला सर्पाने दंश केल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .हा प्रकार शनिवार दि.03/08/2024 रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,पोलिस हवालदार सावंत हे शनिवारी दुपारी काम करीत असताना त्यांच्या पायाला काय तरी स्पर्श झाल्याचे जाणविले तेव्हा त्यांनी पहाताच त्यांच्या पायास दंश झाल्याचे लक्ष्यात येताच या घटनेने पोलिस ठाण्यात धांदल उडाली .तात्काळ त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .