अकिवाट येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या सरपंचच्या पतीचा पाण्यात बुडुन मृत्यु .

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - शिरोळतालुक्यातील अकिवाट येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेले सुहास पाटील हे आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने ट्रॅक्टर मधून गेले असता पाण्याच्या प्रचंड वेगाने ट्रॉलीला पाण्यात खेचल्याने ट्रॉली पलटी होऊन ट्रॅक्टर मधिल सर्व जण पाण्यात पडल्याने सुहास पाटील यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यु झाला आहे ही घटना शुक्रवार दि.02/08/2024 सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.



अधिक माहिती अशी की ,अकिवाट येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी एका ट्रॅक्टर मधून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असताना त्यांनी ट्रॅक्टर पाण्यात घालून वाट काढ़त पुढ़े जात होते.पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रॉली पाण्यात खेचल्याने ट्रॉली पलटी झाल्याने सर्व जण पाण्यात पडले.त्या वेळी अरुण कांबळे व सागर माने यांनी लाइफ जॅकेट घातल्याने पाण्यातुन वाट काढ़त जात होते.

याच दरम्यान ट्रॅक्टर मधून सात नागरिक बस्तवाड अकिवाट दरम्यान असणारया ओता वरील पाण्यातुन प्रवास करत असताना यातील काही जण केळी आणण्यासाठी जात होते.ही दुर्घटना घडल्याचे लाइफ जॅकेट घातलेल्या कांबळे आणि माने यांनी पाहिले असता त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारून वाहून जात असलेल्या पैकी तिघांना सुखरूप बाहेर काढ़ण्यात यश आले  तर दोघे जण पोहत पाण्या बाहेर आले.आणि अन्य दोघांना रेस्क्यु फोर्सच्या मदतीने बाहेर काढ़ण्यात आले.त्यांना तात्काळ उपचारासाठी तेथील  रुग्णालयात पाठविण्यात आले असता अकिवाटचे सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यु झाला.तर एकाची प्रकृती बरी असल्याचे समजते.यात बचावलेल्यात श्रेणीक चौगुले व रोहिदास माने हे अकिवाटचे आहेत.तर केळी व्यापारी अंगद मोहिते,अझहर आलासे व प्रदिप पाटील यांचा समावेश आहे.

पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा मृत्यु झाल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post