मामाच्या घरी आर्किटेक्ट तरुणीची आत्महत्या.



प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे

कोल्हापूर - साळोखेनगरातील केतकी संजय पाटील (वय 28 रा.रचनाकर हौसिंग सोसायटी जवळ,साळोखेनगर देवकंर पाण्ंद)  हिने सोमवार दि.12/08/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास जिवबानाना पार्क येथे मामाच्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग पंख्यांला  दोरीने गळफास लावून घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून  बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी      मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील मयत ही आर्किटेक्ट इंजिनिअर असून ती रविवारी (दि.11) रोजी पुण्याहून कोल्हापुरात येऊन तिचे धामोड येथील मामा सुधाकर शामराव चौगुले (रा.बालिंगा पिरवाडी ता.करवीर) यांचे  जिवबानाना पार्कात घर असून ते बंद अवस्थेत असलेल्या घरी जाऊन हा प्रकार केल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले .तिचे वडील संजय पाटील हे  इंजिनीअर आहेत.यातील मयत केतकी ही अविवाहित आहे.तिच्या पश्च्यात आई वडील आणि एक बहीण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post