प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिवाजी पेठेतील योगेंद्र रघुनाथ ठाकूर (वय 53) हे नाशिक येथे एका औषध कंपनीत विक्री प्रतिनीधी म्हणुन काम करीत होते.ते नोकरी सोडून कोल्हापूरात आले.त्यांना 22 जून 2024 रोजी त्यांच्या मोबाईलवर मुंबई विमानतळावरून अनिल गुप्ता बोलत असून मी सायबर क्राईम शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही कुरिअर केलेल्या पार्सलात 200gm.एमडी ड्रग्ज ,क्रेडिट कार्ड,पासपोर्टसह 35 हजारांची रोख रक्कम सापडली असून तुमच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची भिती घातली.
यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुंटुबियाची बँक खात्याची माहिती घेत त्यांच्या बँकेच्या खात्यातील रक्कमेची बेकायदेशीर व कायदेशीर माहिती घेत त्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याने एका बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले.ठाकूर यांनी भिती पोटी ऑनलाईनने 68 लाख 55 हजार रुपये ट्रान्स्फर केले.त्याच्या नंतर फोन केलेल्या व्यक्तीनी आपले फोन बंद केल्याने नॉट रिचेबल लागले .आपले पैसे आपल्या खात्यात जमा होतील या आशेने त्यानी महिनाभर वाट पाहिली.शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.झाडे यांची भेट घेऊन घडलेली माहिती देऊन फसवणूक केलेल्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.