शासनाच्या या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होणेचे आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.या योजनेमध्ये इयत्ता १२ वी पास, विविध ट्रेडमधिल आयटीआय, पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश करणेत आला असून या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार असून लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना / महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधिल सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इत्यादी अशा प्रशिक्षणार्थी उमेदवार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 

या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे प्रतिमाह विद्यावेतन इ. १२ वी (र.रू. ६०००/-), आय टी आय/पदविका (र.रू.८०००/-), पदवीधर/ पदव्युत्तर (र.रू.१००००/-) शासनामार्फत थेट प्रशिक्षणार्थ्याच्या बँक खात्यावर (online);ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार अहे. ‍

इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्यागाचे नामवंत शहर असून महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून विख्यात आहे. या शहरात वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक विविध उद्योग कार्यरत असून याबरोबरच इंजिनियरिंग क्षेत्रातील उद्योगही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. याद्वारे शासनाच्या या महत्वपूर्ण प्रशिक्षण योजनेमध्ये हे शहर व या शहरातील अनेक उद्योजक अशा रोजगार इच्छुक युवकांना प्रशिक्षण देणेमध्ये महत्वाची भुमिका बजावू शकतात हे सर्वश्रुत आहे. 

या उपक्रमात rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करुन आपला उद्योग / आस्थापनाची नोंदणी करुन आपल्या एकूण पदांपैकी २० % पदांवर प्रशिक्षणार्थींची मागणी करुन शासनामार्फत विद्यावेतनावर इच्छुक युवकांना प्रशिक्षणासाठी लाभ देवून शासनाच्या या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होणेचे आवाहन याद्वारे करणेत येत आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या शासननिर्णयाचे अवलोकन करावे व सहा.आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभाग, विचारे मळा, कावळा नाका, कोल्हापूर यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.


    

Post a Comment

Previous Post Next Post