प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. १२ समाजवादी प्रबोधिनींच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती अर्थात ' भारतीय ग्रंथपाल दिन ' साजरा करण्यात आला. प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ.रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील महान योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रंथालय सेवकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या "ऑगस्ट -२४"
अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.यावेळी पांडुरंग पिसे, दयानंद लिपारे, अशोक केसरकर, नारायण लोटके, शकील मुल्ला ,सचिन पाटोळे , मनोहर जोशी आदी उपस्थित होते.