महिला व मुलींनी आपल्या सुरक्षितेसाठी सक्षम बना : पीएसआय उर्मिला खोत

 द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्गदर्शन शिबीर संपन्न

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी-

देशात महिला व मुली विशेषत: लहान बालिका यांच्यावर लैगिंक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला पायबंद घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनले पाहिजे. आपल्या स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे. कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनी सुध्दा आपल्या पाल्याच्या रक्षणासाठी नेहमी सजग राहिले पाहिजे, असे मौलिक विचार इचलकरंजी निर्भया पथकाच्या प्रमुख व पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी व्यक्त केले. येथील द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीरात त्या बोलत होत्या.

 यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले, लहानपणा पासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलांना उच्च व सुसंस्कारित शिक्षण देण्याची गरज आहे. महिला, मुली व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. यावेळी प्राचार्या वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले.

         यावेळी संस्थेचे चेअरमन विपूल हाळवणकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, समन्वयक अर्चना केंगारे, शिक्षक अवधुत सर, तैजुम शेरकर, योगिता कोष्टी, ममता परिख, जागृती जोशी, रूपाली शिंदे, पुजा धनवडे, राखी हुरकत, राधा साळी, शांता कोष्टी, कृतिका पवार,निर्भया पथकाच्या शिल्पा खोत,धनश्री सावंत,शिल्पा गुरणावते यांच्यासह माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या*.


Post a Comment

Previous Post Next Post