प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ३१ क्रांतिसिंह नाना पाटील यांचे १२५ वे जन्म वर्ष आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, ज्येष्ठ विचारवंत स्वातंत्र्य सैनिक आचार्य शांतारामबापू गरूड यांचा १३ वा स्मृतिदिन
या निमित्ताने समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने सोमवार ता. २ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ६ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व एकपात्री अभिनेते प्रा.डॉ. नवनाथ शिंदे (आजरा) यांचा " क्रांतिसिंह नाना पाटील " हा एकपात्री प्रयोग आयोजित केला आहे. समाजवादी प्रबोधिनी , राजर्षी शाहू पुतळ्याजवळ , इचलकरंजी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिक बंधू भगिनींनी यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.