निशा दंडगे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी  :

पुणे न्यूज एक्स्प्रेस मिडीयाच्या वतीने शिक्षण क्षेञातील उल्लेखनीय कार्याबद्दल इचलकरंजी येथील ना.बा.बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका निशा दंडगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे एका शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिरोज मुल्ला सर  , ज्येष्ठ पञकार प्रा.सागर बोराडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.अध्यक्षस्थानी समाज प्रबोधिनी संस्थेचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी होते.

इचलकरंजी येथील निशा दंडगे यांनी ना.बा.विद्या मंदिरच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून अगदी व्रतस्थ व सेवाभावी वृत्तीने अध्यापनातून सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान जपून विविध माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान दिले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे न्यूज एक्स्प्रेसचे मिडियाचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांच्यासह पञकारिता , सामाजिक, साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रेरणा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले 

यावेळी ज्येष्ठ पञकार धोंडिराम शिंदे ,दिपक ढवळे , वीरभद्र अर्बन सोसायटीचे संस्थापक चेअरमन संतोष जंगम , अब्दुल रशिद ,ग्राहक पंचायतच्या राज्य संघटक सौ.प्रमोदिनी माने ,सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता हुग्गे , तेजस्विनी गोरनाळे , सोनाली दंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर , पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post