प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन विकास निधीतून शहरवासीयांच्या साठी ६ (सहा) अत्याधुनिक फिरत्या शौचालयाची खरेदी करणेत आलेली आहे. नव्याने खरेदी करणेत आलेली फिरते शौचालयाची बांधणी पूर्ण पणे स्टेनलेस स्टील मध्ये केलेली असुन प्रत्येक शौचालयामध्ये एकुण दहा युनिट आहेत यापैकी पाच पुरुषांसाठी आणि पाच स्त्रियांसाठी आहेत.तसेच या शौचालया मध्ये २००० लिटर पाण्याची टाकी असून वॉश बेसिन, फॅन आणि विद्युत व्यवस्था सुद्धा करणेत आलेली आहे. सदर शौचालये आवश्यकतेनुसार शहराच्या विविध भागात ठेवणेत येणार आहेत.
यापैकी एक शौचालय युनिट आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या सुचनेनुसार शहरातील जवाहरनगर येथील शाहीर अमर शेख ऊर्दु प्राथमिक शाळा क्रमांक ५६ येथे महिला शिक्षिका तसेच विद्यार्थीनीं आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवणेत आले आहे.
यावेळी या शौचालयाची सविस्तर माहिती मक्तेदार प्रविण बेलवळे यांचेकडून घेऊन सदर नुतन शौचालयाचे औपचारिक रित्या पुजन शाळेतील विद्यार्थीनीच्या हस्ते करुन आयुक्त यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला.तसेच या शौचालयाचा वापर योग्य पद्धतीने होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त यांनी शाळेच्या शिक्षकांना केले.
शाळेमध्ये शौचालयाची व्यवस्था केलेने याप्रसंगी उपस्थित असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुलाब पुष्प देऊन आयुक्त यांचे आभार मानले.
यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांचेसह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.