इचलकरंजी शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा :- आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे


     


प्रेस मीडिया लाईव्ह :

 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.या योजनेमध्ये इयत्ता १२ वी पास, विविध ट्रेडमधील आयटीआय, पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश करणेत आला असून या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार असून लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना / महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधिल सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इत्यादी अशा प्रशिक्षणार्थी उमेदवार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. 

या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे प्रतिमाह विद्यावेतन इ. १२ वी (र.रू. ६०००/-),   आय टी आय/पदविका (र.रू.८०००/-), पदवीधर/ पदव्युत्तर (र.रू.१००००/-) शासनामार्फत थेट  प्रशिक्षणार्थ्याच्या बँक खात्यावर (online);ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार अहे.    ‍

            इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्यागाचे नामवंत शहर असून महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून विख्यात आहे. या शहरात वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक विविध उद्योग कार्यरत असून याबरोबरच इंजिनियरिंग क्षेत्रातील उद्योगही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.  याद्वारे शासनाच्या या महत्वपूर्ण प्रशिक्षण योजनेमध्ये इचलकरंजी शहर व या शहरातील अनेक उद्योजक अशा रोजगार इच्छुक युवकांना प्रशिक्षण देण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावू शकतात. 

         या योजनेच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत,यांत्रिकी, हार्डवेअर/नेटवर्कींग, सॉफ्टवेअर,),लिपीक- टंकलेखक, गाळणीचालक, स्वच्छता निरीक्षक,ए.सी.ऑपरेटर, साऊंड सिस्टीम ऑपरेटर, वीजतंत्री, तारतंत्री, प्लंबर, फिटर,पंप ऑपरेटर, सर्व्हेअर आणि आरेखक अशी १७ संवर्गातील ८८ पदे उपलब्ध करून देणेत आलेली आहेत.सदर प्रशिक्षण योजने अंतर्गत ६ महिने कालावधी करीता प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणेची संधी मिळणार असून या प्रशिक्षणाचे अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे.

          तरी इचलकरंजी महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देणेत आलेल्या   वरील पदासाठी इचलकरंजी शहरातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in 

( महास्वयंम पोर्टल)

या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करुन संबंधित पदांची माहिती घेवून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा आवाहन  असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.


    

Post a Comment

Previous Post Next Post