प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी- व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे हातकणंगले तालुका विधी सेवा समिती,सखी सावित्री समिती,विशाखा समिती,विद्यार्थी विकास समिती व महिला लैंगिक अत्याचार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी महिला अत्याचार निवारण समितीच्या ॲड.सौ. शुभांगी कदम व महिला दक्षता समिती सदस्या सौ.वैशाली नाईकवडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी .पालकांशी सुसंवाद कसा साधावा .आजच्या पिढीला सुसंस्कृत व स्वसुरक्षित कसे बनवले पाहिजे . विद्यार्थी - पालक - शिक्षक - पोलीस व न्यायमंडळ यांच्यामध्ये सुसंवाद कसा साधला गेला पाहिजे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.निर्भया पथकाच्या सदस्या शिल्पा बुराणपुरे यांनी आपल्याबाबत तसेच आपल्या आजूबाजूला काही अनुचित प्रकार घडत असेल तर महाराष्ट्र पोलीस हेल्पलाईन नंबर 112 डायल केला तर कशी मदत मिळेल त्याचबरोबर निर्भयापथक कसे काम करते याबाबत सविस्तर माहिती दिली.प्रशालेचे माजी विद्यार्थी व ॲड.शहानवाज पटेल यांनी सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवूनच आपण इतरांवर विश्वास ठेवला पाहिजे असे सांगितले. इचलकरंजी बार असोशिएशन अध्यक्ष ऍड.शिवराज चुडमुंगे यांनी कायद्याची जाणीव समाजात वावरताना कशी ठेवावी हे सांगितले तर ऍड आयुब कोतवाल यांनी इ -रिपोर्ट नंतर कायदा कसा असतो . त्या कायद्याचे पालन कसे केले जाते हे सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे व सखी सावित्री समितीचे सर्व सदस्य यांनी केले होते.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ.ए.एम कांबळे ,कार्याध्यक्षा एस. एस.कुंडले,महिला अत्याचार निवारण समितीच्या अध्यक्षा सौ.शुभांगी कदम,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच सखी सावित्री समितीच्या पालक सदस्या अश्विनी कुलकर्णी,सखी सावित्री समिती,विशाखा समिती, विद्यार्थी विकास समितीचे सदस्य विद्यार्थी -विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक ए ए खोत सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय केतकी कुलकर्णी तर सूत्रसंचालन भक्ती कडतारे हिने केले व आभार सौ.ए.डी.दाभोळे यांनी मानले.