महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनेवर नियंत्रण ठेऊन कायदा सुव्यवस्था आभाधित राखावी - अप्पर पोलीस अधिक्षाना भाजपचे निवेदन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  : कोलकत्ता, बदलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था आबाधित रहावी. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी.

   कोलकत्ता, बदलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी आत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या आहेत हे अमानवीय आहे. ह्या घटनांपासून समाजामध्ये चिड निर्माण होत आहे, असंतोष पसरत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील विविध लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. देशातील अत्याचाराच्या होत असलेल्या अशा घटनेमुळे समाजामध्ये एकमेकांनाकडे बघण्याचा दृष्टीकीन बदलत आहे. त्याचा परिणाम अशा अत्याचारां घटनांन मध्ये होत आहे. 

इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय यांची संख्या जास्त असल्याने मुलींची, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणता आहे. शासनाने शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल अशा ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पोलीस प्रशासनाने शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल यांची एकत्र बैठक घेऊन शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी सी सी टीव्ही कॅमेरा बसविण्याचे आदेश द्यावेत.  

तसेच शासनाने निर्भय पथकाची स्थपना केली आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय परिसरामध्ये निर्भय पथकाची गस्त वाढवावी. जेणेकरून मुलींची छेड छाड होण्याच्या अशा घटनांना आळा बसेल. व कायदा सुव्यवस्था आभाधित राहील. तसेच शहरातील गुन्हेगारीवर कठोरपणे अंमलबजावणी करण्या साठी सकारात्मक चर्चा झाली व शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याच्या संबंधित नियोजन केले तर भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा कडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले 

  भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला आघडीच्या वतीने शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, व महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडेगे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते, उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष दिपक पाटील, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, अमित जावळे, प्रदीप मळगे, सुधाकर हेब्बाळे, अनिस म्हालदार, सौ. सुप्रिया मजले, वर्षा कांबळे, सौ. निर्मला कुरुंदवाडे, सौ. संगीता घोरपडे, सौ.अलका विभूते

छाया तोडकर,दिपक कडोलकर, प्रमोद पाटील, प्रविण पाटील, चिदानंद कोटगी, सागर कचरे, हेमंत वरुटे , संजय गेजगे, राहुल गागडे, मनोज जाधव, अर्जुन सुतार, राहुल हंचाटे, नितीन पडियार, सुरज आडेकर, मोहन बनसोडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post