प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बजरंग लोणारी यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलतांना बजरंग लोणारी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा ,स्वातंत्र्याची विचारधारा ,स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेली राज्यघटना आणि त्यात अंतर्भूत असलेली सर्वांगीण समानतेकडे नेणारी मूल्ये यांचे महत्त्व स्पष्ट केले . तसेच गेल्या काही वर्षात या मूल्यांची जातीय व धर्मांध विचारधारांनी केलेली पद्धतशीर हेळसांड याचा उल्लेख केला. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वजांनी मिळविलेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर राज्यघटनेतील मूल्य व्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी शशांक बावचकर, प्रा .रमेश लवटे, दयानंद लिपारे,उज्ज्वला जाधव, शकील मुल्ला, अशोक माने,गजानन पाटील, भिमराव नायकवडी आदींसह अनेकजण उपस्थित होते.स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पांडुरंग पिसे यांनी केले.