प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवार दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील राजवाडा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शहरातील किसनराव आवळे मैदान, शहापूर रोड येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अब्राहम आवळे, सहा आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आयुक्त यांचे स्वीय सहायक सदाशिव शिंदे, सचिन शेडबाळे, महेश बुचडे, दिलीप मगदुम आदी उपस्थित होते.