प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : दर रविवारी लहान मुले व महिला भगिनी यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संस्कार वर्ग कार्यक्रमात आज रविवार दिनांक 4/8/2024 रोजी दिपआमवस्या म्हणजे आषाढी अमावास्याचे हिंदू धर्मात असलेले महत्त्व मुलांना सांगण्यात आले.पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळामध्ये पाणी शिरलेले असते त्यामुळे असे प्राणी कोरड्या ठिकाणी वास्तव्यास येतात ते आपल्या घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी घरांची स्वच्छता करून दिवे लावून सन साजरा केला जातो,
यादिवशी घरच्या कुलदिपीका, कुलदिपक यांना कणकीच्या विषम संख्या दिव्यांनी ओवाळले जाते.त्यांना दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे हे लक्षात आणून दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. योगिता सचिन हळदे, ह.भ.प.श्री महादेव चौगुले ह.भ.प.श्री.दगडू करडे व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन हळदे यांच्यासह भागातील महिला व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.