प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
नाशिक जिल्ह्यातील मौजे पांचळे येथे रामगिरी महाराज यांनी अत्यंत षड्यंत्र पद्धतीने जाणून बुजून इस्लाम धर्माचे महान प्रेषित पैगंबर हजरत महंमद ( सल्लल्लाहू अलैहि वसल्लम ) यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांची त्यांची विटंबना केली आहे. तरी पोलीस प्रशासनाने अशा समाजकंटकाला अजून अटक केली नाही.
या घटनेच्या निषेधार्थ व त्या ढोंगी महाराजाला तात्काळ अटक व्हावी. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चेमध्ये हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील मुस्लिम समाजाने सहभागी होऊन त्या गोष्टीचा निषेध करण्यात आला त्यावेळी हेरले येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.