लाच लुचपत प्रतिबंधक कायदे अंतर्गत अलिबाग कुरुल ग्रामपंचायत मध्ये 50 हजार रुपये लाच स्वीकारताना दोन आरोपीस रंग हात पकडले

  

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

 रायगड अलिबाग मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायदे अंतर्गत अलिबाग कुरुल ग्रामपंचायत मध्ये 50 हजार रुपये लाच स्वीकारताना दोन आरोपीस लाच घेताना रंग हात पकडले


आरोपी  

1. श्रीहरी अर्जुनराव खरात, वय 36 वर्षे, धंदा- नोकरी, ग्रामसेवक, नेमणूक- कुरूळ ग्रामपंचायत, अलिबाग रायगड. राह- सीगल रेसिडेन्सी, बिल्डींग नं.6, खोली नं. 202, गोंधळपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. *(वर्ग 3)* 

2. सुजित श्याम पाटील उर्फ पिंट्या, वय 39 वर्षे, धंदा- नोकरी, लिपिक, नेमणूक- कुरूळ ग्रामपंचायत अलिबाग रायगड. राह- गाव कुरूळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. *(वर्ग 4)* 

लाचेची मागणी रुपये 50,000/-लाच स्विकारली 

रू.50,000/- हस्तगत रक्कम-* रु. 50,000/-लाचेची मागणी -* दि. 16/08/2024 रोजी लाच स्विकारली दि. 20/08/2024 रोजी 

लाचेचे कारण -. तक्रारदार यांनी मौजे कुरूळ तालुका अलिबाग येथे भूमापन क्रमांक व उपविभाग 34/4 येथे स्वतंत्र घर बांधलेले आहे.

    सदर घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणे करिता ग्रामपंचायत कुरूळ येथील ग्रामसेवक आरोपी क्रमांक 1) यांना विनंती केली होती   

     सदर घरपट्टी आकारण्यासाठी व असेसमेंट उतारा मिळणे करिता ग्रामसेवक आरोपी क्रमांक 1) श्रीहरी खरात यांनी तक्रारदार यांच्याकडे 50,000/- रुपये लाच दिनांक 16/08/2024 रोजी मागितली.

    दि. 20/08/2024 रोजी आरोपी क्रमांक 1) श्रीहरी खरात यांनी सदरची रक्कम रुपये 50,000/- आरोपी क्रमांक 2) सुजित पाटील यांस स्वीकारण्यास सांगितले असता त्यांनी सदरची रक्कम रुपये 50,000/- कुरूळ ग्रामपंचायत आवारात तक्रारदार यांच्याकडून लाच म्हणून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे....

                                           

सापळा पथक -

पोलीस उप अधीक्षक श्री शशिकांत पाडावे, 

सफौ. विनोद जाधव,

सफौ. अरूण करकरे,

पोह. 2180/महेश पाटील, 

चापोह सागर पाटील, 

मार्गदर्शन अधिकारी :-

 मा.श्री. सुनिल लोखंडे,

पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र

मा.श्री.महेश तरडे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र.

सक्षम अधिकारी - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग

रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*


अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड 

 *दुरध्वनी क्रमांक ०२१४१- २२२३३१*

 *टोल फ्रि क्रं. १०६४*

श्री.शशिकांत पाडावे,

पोलीस उप अधीक्षक,

ला.प्र. वि., रायगड

मो. क्र. *9870332291**

Post a Comment

Previous Post Next Post