क्राईम न्यूज : मिळकतीवर नाव नोंदणी साठी चार हजारांची लाच प्रकरणी भूमापन अधिकारी ताब्यात.


प्रेस मीडिया लाईव्ह

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- वारसा हक्काने मिळकतीवर नाव नोंदणी साठी चार हजारांची लाच मागणारा भूमापन अधिकारी तुषार महादेव सोनवणे (वय 45 .रा बामणोली ,सांगली) आणि पंटर अमर विक्रम चौगुले (वय 42.रा.हातकंणगले) यांना लाचलुचपतचे बापू सांळुखे यांच्या पथकाने मंगळवारी (दि.13) सापळा रचून पकडले.

अधिक माहिती अशी की,हातकंणगले तालुक्यातील अंबप येथील तक्रारदार यांनी टोप येथे भूमापन कार्यालयात अर्ज केला होता.त्या वेळी येथील भूमापन अधिकारी तुषार सोनवणे यांनी आठ हजार रुपयांची लाचेची मागणी करत त्यात तडजोड करून चार हजार रुपये देण्याचे कबूल केले.ही रक्कम तक्रारदाराला नागाव येथे घेऊन येण्यास सांगितले.याची माहिती लाचलुचपत विभागाला तक्रारदाराने तक्रार करून दिली होती.त्या प्रमाणे लाचलुचपतच्या पथकाने चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post