रूई येथील तरुणाची पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील रुई येथे रहात असलेले समीर शब्बीर मुजावर हे पत्नी आणि मुला समवेत रहात आहेत.त्यांचे नातेवाईक कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना पहाण्यासाठी जात असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा आपल्याला भेटावयाचे आहे असा कॉल आला.ते ओके म्हणुन कोल्हापुरात हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांना भेटण्यास आले असता परत त्यांना कॉल येऊन हॉस्पिटलच्या खाली थांबल्याचे सांगितले
ते खाली आले असता अनोळखी व्यक्तीने गाडीत बसवून कुणाला तरी त्या व्यक्तीने फोन लावला फोन वरुन समीर मुजावर यांना तुमची काही कागदपत्रे व डॉक्युमेंट आमच्याकडे असल्याचे सांगून दहा लाखांची मागणी केली.त्या वेळी समीर यांनी त्या व्यक्तीस कोणती कागदपत्रे असे म्हणत त्याच्याशी माझा काही संबंध नाही म्हणत गाडीतुन खाली उतरत असताना तुम्ही जर मागणी केलेली रक्क्म दिली नाहीतर तुम्हाला जड जाईल असे अशी धमकी दिली.मी हॉस्पिटलच्या कामात असल्याने मी याकडे दुर्लक्ष केले.परत मला त्या व्यक्तीचा कॉल करून तुम्ही मनावर घेतलं नाही आम्ही मागणी केल्या प्रमाणे दहा लाख रुपये द्या .नाहीतर तुम्हाला अवघड जाईल .
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मी हातकंणगले पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला.परत रुई येथे आमच्या घरा समोर मी घरी नसताना दोघे इसम विना नंबरच्या गाडीतुन घरी येऊन गेल्याचे घरच्यांनी मला माहिती दिली.या वरुन असं लक्षात आलं की ही अनोळखी व्यक्ती माझ्यावर पाळत ठेऊन असल्याचे दिसून येते मी रोज कुठे जातो काय करतो हे त्यांना माहीत असणार यामुळे या लोकांच्या कडुन मला व माझ्या कुंटुबियांना जिवाला धोका असल्याने पोलिसांनी याचा सोक्ष मोक्ष लावून ती व्यक्ती कोण आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती मिळाली आहे.