स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गडहिग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथे रहात असलेल्या सुशिला विष्णु चौगुले या कोल्हापुरातील नातेवाकाच्याकडे आल्या होत्या.त्या आपल्या गावी परत जाण्यासाठी एसटी स्टँडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या.गडहिग्लज एसटी आल्यानंतर एसटीत चढ़त असताना खांदयावर अडकवलेली पर्सची चेन ओढ़ुन अनोळखी व्यक्तीने 140 gm.वजनाचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता दागिने मिळाले नसल्याने त्यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
हा प्रकार 24/07/2024 रोजी घडला होता.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि शाहुपुरी पोलिसांनी एकत्रितपणे करीत असताना ही चोरी इंचलकंरजीतील महिलेने केल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दि.14 रोजी मिळालेल्या पत्यावर जाऊन सदर महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हयांची कबुली दिली.त्यानंतर तिच्या कडील असलेले 140gm.वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून तिला शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.