सुपारी देत सहकाऱ्याची हत्या , नंतर मारेकऱ्यांशी झाला वाद


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 खासगी मिटींगसाठी रायगडात आलेल्या नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंटपैकी एक असलेल्या सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर 24 ऑगस्ट रोजी आढळून आला होता.

यानंतर दुसरा एजंट अमिर खानजादा याचा मृतदेह बुधवारी (28 ऑगस्ट) पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्याच्या रस्त्यावर सापडला होता. या दोघांच्या मृत्यूचे गृढ उकलण्यात अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे जमीन व्यवहाराच्या वादातून सुमित जैनने अमिर खानदाजा याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.


सुमित जैन (38, नेरुळ, नवी मुंबई) आणि अमीर खानजादा (42) दोघे मित्र आणि इस्टेट एजंट आहेत. 21 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 च्या सुमा रास खासगी मिटींगला जायचे असल्याने अमिर खानजादा हा सुमित जैनच्या इमारतीखाली आला होता. यानंतर दोघे मित्र रात्री कारने मिटींगसाठी निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी आले नाहीत आणि त्यांचे मोबाइलही बंद होते. त्यामुळे दोन्ही मित्रांच्या घरच्या मंडळींनी एकमेकांशी चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नेरुळ पोलीस ठाण्यात दोघे हरवल्याची तक्रार दाखल केली.


पोलिसांनी कारचा जीपीएस ट्रॅक केला असता त्यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असल्याचे लक्षात आले. याबाबत खोपोली पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना कारमध्ये सुमित आणि अमिर दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या झुडपात दोघांचा शोध घेतला तसेच फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाचा घटनास्थळी बोलवून घेतले. यावेळी तपास करताना कारमध्ये बंदुकीच्या दोन गोळ्या सापडल्याचे निदर्शनास आले.


सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर 24 ऑगस्ट रोजी आढळून आला होता, तर अमिर खानजादा याचा मृतदेह बुधवारी पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्याच्या रस्त्यावर सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत पाच आरोपींना अटक केली आहे, तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे जमीन व्यवहाराच्या वादातून सुमित जैनने अमिर खानदाजा याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, नवी मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सुमित जैन याने जमीन व्यवहाराच्या वादातून अमिर खानजादा याची सुपारी दिली होती. अमिर खानदाजा याची 21 ऑगस्ट रोजी नेरुळ येथे गाडीतच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाळा येथील अभयारण्यात टाकून दिला होता. त्याच्या हत्येत आपले नाव येऊ नये म्हणून सुमित जैन याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वत:च्या पायावर खोपोली येथे गोळी मारून घेतली. मात्र स्वत:ला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरिरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अशातच हत्येची सुपारी दिलेल्या मारेकऱ्यांनी कबूल केलेले 50 लाख रुपये कधी देणार अशी विचारणा करत सुमित जैन याच्यासोबत वाद घातला. याचदरम्यान, मारेकऱ्यांनी सुमित जैनच्या पायावर आणि त्याच्या शरीरावर चाकूने वार केला. यात सुमित जैन याचा मृत्यू झाल्याची माहिती दीपक सोकोरे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post