पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख यानेच सुपारी दिल्याचे निष्पन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
कर्जत येथील सुपारी घेवून हत्तेचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण खातेने अटक केली . दिनांक 25/06/2024 रोजी सकाळी 10.30 वा च्या सुमारास जखमी श्री. अनिल हरीश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते असे त्याचे क्रेटा कार एमएच-46 बीई 5260 मधून नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना काही 05 अनोळखी आरोपितांनी कारमधून येवून त्यांना काही माहिती विचारण्याचा बहाणा करून गाडी थांबविण्यास सांगितले त्यांनी गाडी थांबवल्या नंतर नमूद अनोळखी आरोपित यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड असे हत्यार घेवून त्या लोखंडी रॉडने उपटी मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद असल्याने त्या वादाचा राग मनात धरून सुडापोटी सदरचा प्रकार झाल्या असल्याचे सांगितले. त्याबाबत फिर्यादी श्री. अनिल देशमुख यांनी दिनांक 25/06/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये इसम नामे 1) जयेंद्र गजानन देशमुख, 2) प्रशांत सुर्यकांत देशमुख, 3) गजानन बाळाराम देशमुख 4) योगेश वसंत देशमुख 5) विवेक विश्वनाथ देशमुख 6) श्रीराम बाळाराम देशमुख 7) सचिन गजानन देशमुख व इतर 05 अनोळखी इसम यांचे विरुद्ध गु.र.जि.नं 180/2024 भा.द.वि.कलम 307,324,506,143, 147, 148, 149,120 (ब) सह मु.पो.कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस ठाणे करीत असताना तपासा दरम्यान आरोपी नामे योगेश वसंत देशमुख यास दिनांक 25/06/2024 रोजी अटक करण्यात आली. परंतु नमूद गुन्ह्यातील इतर 05 अनोळखी आरोपी यांचे बाबत काहीएक माहिती प्राप्त होत नव्हती. त्याच दरम्यान गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जयेंद्र देशमुख याने कट करून 05 अनोळखी इसम यांना पैश्याचे आमिष दाखवून त्यांनीच सदरचा गुन्हा केल्याचे असे पोलिसांना सांगण्याबाबत समजावून एका होंडा सिटी कारसह कर्जत पोलीस ठाणे येथे आत्मसमर्पण करण्याबाबत सूचना देवून पाठविले.
परंतु पोलिसांना त्याबाबत संशय आल्याने नमूद इसमाकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी ते सदर गुन्ह्यातील खरे आरोपी नसल्याचे सांगून त्यांना पाहिजे आरोपी जयेंद्र देशमुख याने पैश्याचे व नोकरीचे आमिष दाखवून सदरची केस अंगावर घेण्यासाठी पाठवून दिल्या असल्याचे कबुल केले.
सदरचा गुन्हा क्लीष्ट, गुंतागुतीचा, व व्याप्ती मोठी असल्याने त्यानंतर दिनांक 31/07/2024 रोजी मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक सो रायगड अलिबाग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना योग्यत्या सूचना देवून व मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे करतील असे आदेशित केले. पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, व 08 पोलीस अंमलदार यांचे विशेष टीमचे गठन करून त्यांना तपासाबाबत योग्यते मार्गदर्शन केले.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे नमूद गुन्ह्यातील 05 अनोळखी आरोपी म्हारळ ता. कल्याण, जी. ठाणे येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत तात्काळ हालचाली करून म्हारळ कल्याण येथून दिनांक 02/08/2024 रोजी इसम नामे 1) श्री. शुभम राजेंद्र कांगणे वय-26 वर्ष रा. रूम नं.08 ओमसाई नगर, सेंच्युरी शाळेसमोर म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे 2) श्री. नंदेश मिलिंद खताते वय 22 वर्ष रा.आशीर्वाद अपार्टमेंट रूम नं.02 जी विंग तळमजला एमआयडीसी रोड म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे यांना ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी पाहिजे आरोपी पळसदरीचा सरपंच 1) जयेंद्र देशमुख 2) प्रशांत देशमुख यांचे सांगण्यावरून त्यांनी व त्यांचे साथीदार 1) राजेश सिंग 2) नितेश सिंग 3) बंटी कांबळे सर्व रा. म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे सदरचा गुन्हा म्हारळ गाव ता. कल्याण जि.ठाणे यांनी आपसात संगनमत करून केला असल्याचे सांगितले म्हणून त्यांना दिनांक 03/08/2024 रोजी 00.55 वाजता अटक करण्यात आले आहे. सदर आरोपी यांचा पूर्व गुन्हेगारी इतिहास पडताळा असता त्यांचे विरोधात ठाणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे येथे अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे माहिती प्राप्त झालेली आहे.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपित यांचेकडून गुन्हा करताना वापरलेले हत्यार 03 लोखंडी रॉड, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी मोटार कार न.एमएच-05 सी.एम 2387 ही जप्त करण्यात आलेली आहे. अटक आरोपी सध्या मा. न्यायालयाचे आदेशाने पोलीस कोठडीत असून इतर 03 अनोळखी आरोपित तसेच आरोपित नामे 1) जयेंद्र गजानन देशमुख 2) प्रशांत देशमुख दोन्ही रा. नांगुर्ले, पोस्ट. पळसदरी ता. कर्जत जि. रायगड याचा शोध सुरु आहे.
FIR मधील नाव असलेले एकूण 07 आरोपी प्रत्यक्षात मारण्यासाठी नव्हते. त्यामुळे कलम 120 (b) लावण्यात आले आहे. 07 आरोपींपैकी योगेश वसंत देशमुख यास तपासा दरम्यान अटक करण्यात आले आहे. तो मा. सत्र न्यायालयाचे आदेशाने सध्या जामिनावर मुक्त आहे. उरलेले 06 आरोपी पैकी 04 आरोपित 1) गजानन बाळाराम देशमुख 2) विवेक विश्वनाथ देशमुख 3) श्रीराम बाळाराम देशमुख 4) सचिन गजानन देशमुख यांना पनवेल मा. सेशन कोर्ट यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. व त्यातील 02 आरोपी 1) जयेंद्र देशमुख 2) प्रशांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मा. सत्र न्यायालयाने नामंजूर केलेला असून त्यांनी आता मा. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
प्रत्यक्ष मारण्यासाठी 05 अनोळखी आरोपी पैकी 1) शुभम राजेंद्र कांगणे वय-26 वर्ष रा.रूम नं.08 ओमसाई नगर, सेंच्युरी शाळेसमोर म्हारळगाव ता. कल्याण जि. ठाणे 2) श्री. नंदेश मिलिंद खताते वय 22 वर्ष रा.आशीर्वाद अपार्टमेंट रूम नं.02 जी विंग तळमजला एमआयडीसी रोड म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत. 1) शुभम राजेंद्र कांगणे याचे विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे शरीरवोधातील गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहेत. उर्वरित आरोपी नामे 1) राजेश सिंग 2) नितेश सिंग 3) बंटी कांबळे सर्व रा. म्हारळगाव ता. कल्याण जि. ठाणे यांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सफौ प्रसाद पाटील, सफौ/संदीप पाटील, पोह सुधीर मोरे, पोह/श्याम कराडे, पोह/प्रतिक सावंत, पोह/राकेश म्हात्रे, पोह/अक्षय जाधव, पोह/ ईश्वर लांबोटे, पोशी/अक्षय जगताप व सायबर पोलीस ठाणेतील, पोना/अक्षय पाटील यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालय