मोठी बातमी : रसायनी व खालापूर पोलीस ठाणे हद्दीतून 02 कुख्यात गुन्हेगार आरोपींकडून 02 पिस्टल व काडतुसे जप्त.

 स्थानीक गुन्हे शाखा रायगडची धडाकेबाज व उल्लेखनीय कामगिरी.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

दिनांक 06.08.2024 रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/ राजेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम मौजे खाने आंबिवली, रसायनी, याठिकाणी अग्निशस्त्र विक्री करीता येणार आहे. सदरची खबर मिळताच राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती दिली. बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ पोलीस उपनरीक्षक लिंगप्पा सरगर, सफौ राजेश पाटील, सफौ प्रसाद पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह सुधीर मोरे, पोह राकेश म्हात्रे, पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून त्यांना स्वतःची दक्षता घेऊन कारवाई करण्याची सूचना दिल्या. सदर पथक सदर घटनास्थळी जाऊन मिळालेल्या वर्णनाच्या इसमावर पाळत ठेवण्यात आली रात्री 22.30 वाजण्याच्या सुमारास एक इसम पिल्लई हायस्कूलच्या गेट समोर उभा राहून कुणाची तरी वाट पाहत असल्याचा दिसून आला. सदर इसमास सदर पथकाने नाव विचारले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, त्याला ताब्यात घेण्यात आले त्याचे अंग झडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावटी चे पिस्टल व 2 जिवंत काडतूस मिळून आले. सदर पथकाने सदर घटनास्थळी 02 पंचाना बोलावून सदर इसम व त्याचे कडील पिस्टल व 02 जिवंत काडतूसे पंचनाम्यान्वये ताब्यात घेण्यात आली. सदर इंसमाविरुद्ध रसायनी पोलीस ठाणे येथे गु.र.न 174/2024 कलम 3,25, भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी सदर इसमास अटक करण्यात आली आहे.


अटक आरोपिताचे नाव, पत्ता-

निखिल रवींद्र जाधव वय-27 रा. दत्ता अपार्टमेंट मोहोपाडा, खालापूर मूळ गाव रत्नागिरी,वर नमूद प्रमाणे कारवाई झाल्यानंतर,, सदर अटक आरोपिताकडून माहिती प्राप्त झाली की,त्याचा ओळखीचा इसम नामे मुन्ना राजबली दुबे रा.नवी मुंबई मूळ रा. बिहार याचेकडे देखील एकपिस्टल असून तो खालापूर नाका याठिकाणी विक्रीकरिता आलेला आहे व त्याचे वर्णन दिले सदरपथकाने खालापूर फाटा येथे सापळा रचून सदर इसमावर पाळत ठेवण्यात आली पहाटे 03.00 वाजण्याच्या सुमारास सदर इसम खालापूर फाटा येथे दिसून आला त्याला शिताफीने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस मिळून आले.

 सदर पथकाने 02 पंचांना बोलावून पंचनाम्यान्वये सदर इसमाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 03 जिवंत काडतूस ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.339/24 कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपींचा पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळून पाहिली असता.आरोपी नामे मुन्ना राजबली दुबे याचेवर.....

1) नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गु.र.न.417/2016 कलम 302,397,120 b,34 भा.द.वि.सह 3,25,27, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे

2) नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गु.र.न.402/2017 कलम 302,34,120 b, भा.द.वि.सह 3,25,27, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे

3) तुर्भे पोलीस ठाणे गु.र.न 150/2010 कलम 302,120 b 34 भा.द.वि.सह 3,25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे

4) तुर्भे पोलीस ठाणे गु.र.न 151/2011 कलम 302,120 b 34 भा.द.वि.सह 3,35, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे असे 03 खुनाचे गुन्हे दाखल आहेत व सदरचे गुन्हे अग्निशस्त्राने गोळ्या झाडून केलेले आहेत.

5) दहिसर पोलीस ठाणे गु.र.न 98/2023 कलम भा.द.वि.सह 4,25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे

6) नौपाडा पोलीस ठाणे गु.र.नं. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135, 4,25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनरीक्षक लिंगप्पा सरगर, परि. पोसई/किरण नावले, सफौ/राजेश पाटील, सफौ/संदीप पाटील सफौ/प्रसाद पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह/सुधीर मोरे, पोह/राकेश म्हात्रे व सायबर पोलीस ठाणेकडील पोना/अक्षय पाटील यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


जन संपर्क अधिकारी

पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालय

Post a Comment

Previous Post Next Post