कृषीपंडीत सुरेश देसाई यांचा 75 वा वाढदिवस उत्साहात साजरा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

    बेडकिहाळ येथील कृषीपंडीत सुरेश देसाई यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या वतीने बेडकिहाळ येथील विठ्ठल मंदीरात दि 14 रोजी उत्साहात बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.आर.गळतगे ज्येष्ठ साहित्यिक व निर्वुत प्राचार्य नाडगे महाविद्यालय कारदगा, हे होते.


 कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून व कु. राजवी देसाई यांच्या प्रार्थनेने करन्यात आली. तसेच 75 ज्योतीने क्रुषीपंडीत सुरेश देसाई यांना देसाई कुटुंबांच्या वतीने औक्षण करन्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ.कल्पना सुरेश देसाई, बसवप्रभु देसाई, ओंकार देसाई, निरंजन देसाई अशा त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. त्यानंतर 75 किलो तांदळाने तुलाभार करुन ते तांदुळ विध्यार्थी विकास प्रबोधिनी संचलित बालोद्यान अब्दुललाट अनाथ आश्रमाला दान करण्यात आले.तसेच 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार देसाई कुंटुबाकडुन करण्यात आले. 

  स्वागत व प्रास्ताविक भाषण साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन अध्यक्ष प्रा. डी.एन.दाभाडे म्हणाले की कृषीपंडित सुरेश देसाई म्हणजे मनाने वाचेने मांगल्य जपणारे सर्वांच्या मताचा आदर करणारे कृषी, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी सदैव कार्यरत राहुन झटणारे गरजुंच्या, गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. 1983 साली त्यांनी उसाचा पाला जाळुन न टाकता ती सरीत भरणी करुन त्यातुन विशिष्ट खताची मात्रा तयार होते. हे सर्व शेतकऱ्यांना पटवून दिले.1985 मध्ये प्रथमच मिश्र हिरवळी खतांबदल  पांडेचेरी येथील आरोव्हीलमध्ये प्रयोग करून त्याचे महत्त्व देश -विदेशात समजावून सांगण्यात यशस्वी झाले.तसेच बेडकिहाळ मध्ये 1991 मध्ये सेंद्रिय शेती संघाची स्थापना केली. तसेच चीनच्या दौऱ्यावर गेले असता माणसांना वापरणारे आक्युपंचर तंत्रज्ञान फळांच्या झाडांसाठी केले त्यामुळे झांडाची खुंटलेली वाढ झपाट्याने होऊ लागला. उसाच्या शेतात दोन सरीमध्ये अंतर ठेऊन कशी शेती करावे याबाबत माहिती दिली. सेंद्रिय शेती कश्या पद्धतीने करावी याबाबत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. फक्त भारतातच नव्हे तर चीन, मॉरिशयस, नेपाळ अशा अनेक देशांमध्ये जावुन त्यांनी शेतीसाठी मार्गदर्शन केले आहे. सर्व शेतकरी वर्गाला ते आधारवड म्हणून कार्य करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक राज्याकडुन कृषीपंडित ही पदवी बहाल केली आहे. त्यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकामध्ये सांगितला. 

तसेच मलगौंडा पाटील मनोगतामध्ये म्हणाले की कृषीपंडित सुरेश देसाई हे खुप मोठे शेतीतज्ञ आहेत. सेंद्रिय शेती कश्या पद्धतीने करावे याबाबत बेडकिहाळ व परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. असे ते म्हणाले. 

   त्यावेळी बंडा जोशी, प्रकाश किणीकर, आर.जी.डोमणे, ॲड ब्रिजेश शास्त्री, अजय आवटी, जगदीश पाटील, निरंजन देसाई,के व्ही जोशी, बाळासाहेब शिंदे, सागर केसरकर, महादेव गिरमल, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे, साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन सर्व सदस्य, दसरा कमिटी सर्व सदस्य तसेच अनेक संघ संघटना, व गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट व साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड प्रिती हट्टीमणी यांनी केले. आभार जी.बी.निंबाळकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post