व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग प्रदेश कार्याध्यक्षपदी अब्दुल कय्यूम

 राज्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करणार- अब्दुल कय्युम


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद  ऑगस्ट- व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग साठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी रोहित जाधव, प्रदेश कार्याध्यक्षपदी पत्रकार अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांची निवड झाली आहे.व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या झालेल्या निवडणुकीमध्ये चौघांनी उमेदवारी दाखल केली होती. यातून प्रदेश अध्यक्ष पदासाठी सांगलीचे रोहित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच कार्याध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस या पदासाठी ही निवड जाहीर करण्यात आली.

२८ जुलै रोजी झालेल्या मतदानाचा निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून रोहित जाधव सांगली, प्रदेश सरचिटणीस म्हणून वामन पाठक लातूर, प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून अब्दुल कय्युम छत्रपती संभाजी नगर, तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून विकासकुमार बागडी जालना यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगची निवडणुकीमध्ये नव्याने निवडून आलेले सर्व पदाधिकारी कार्यक्षम आहेत. त्यांच्याकडून आगामी काळात अधिक सक्षम पणे काम होईल असा विश्वास संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून चौघाची राज्य कार्यकारणीवर निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणीची लवकरच निवड जाहीर करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष रोहित जाधव यांनी सांगितले.

राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना घेऊन काम करणार - अब्दुल कय्युम

"येणार्‍या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन अत्यंत चांगले काम करून दाखवणार आहे. साप्ताहिकांच्या विविध समस्या सोडवणार आहे, प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्युम यांनी सांगितले."

Post a Comment

Previous Post Next Post