प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे :
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत यांच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मधील अडीअडचणी व समस्या बाबत चर्चासत्र व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला कार्यक्रमास प्रथमता प्रस्ताविक अतिग्रे गावचे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री बाबासाहेब कापसे यांनी केले .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हातकणंगलेविधानसभा मतदारसंघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती हातकलंगले तालुका प्रमुख माननीय अविनाश बनगे साहेब यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड् यांनी केले यावेळी उपस्थित महिलांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेमध्ये महिलांना अजून कोण कोणत्या अडचणी आहेत हे महिलांच्या कडून सांगण्यात आले त्याचे निरसन हातकणंगले तालुकाप्रमुख माननीय श्री अविनाश बनगे साहेब व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने साहेब यांनी केले
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांनी महिलांना चांगले मार्गदर्शन केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आलेल्या पैशाचे बहिणीने योग्यता स्वरूपात म्हणजेच महिलांनी व्यवसाय उद्योग करून चांगला उपयोग करावा असे मार्गदर्शन करण्यात आले
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या योजनेमध्ये उत्कृष्टपणे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सीआरपी ,ग्रामविकास अधिकारी, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर महिलांनी आलेल्या मान्यवरांना लाडका भाऊ या नात्याने रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला
या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सरपंच माननीय श्री सुशांत वड्, भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील ,ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, अनिरुद्ध कांबळे ,नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अक्काताई शिंदे ,कलावती गुरव, कल्पना पाटील ,दिपाली पाटील ,छाया पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,पत्रकार भरत शिंदे, उत्तम पाटील,राम पाटील ,भाजप नेते लालासो पाटील, कृष्णा पाटील ,अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशा वर्कर, सीआरपी तसेच गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेवटी या कार्यक्रमाचे आभार गावातील सामाजिक कार्यकर्त्या सौ अमृता राम पाटील यांनी मांडले .