ॲड. आंबेडकर यांनी केली माजी सैनिकाच्या प्रकृतीची विचारपूस
प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला : भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर रविवारी नगरसेविका पती गजानन सोनोने व त्याच्या साथीदारांनी जागेच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला होता. सैन्यात असताना लढाई करताना बंदुकीची गोळी लागलेले सैनिक बुद्धपाल सदांशिव सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अकोला येथे स्थायिक झाले होते. माजी नगरसेवक आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदाराने जातीय मानसिकतेतून बुद्धपाल सदाशिव यांच्यावर हल्ला केला होता. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून प्रकृती संदर्भात माहिती घेतली .
हिंगणा फाटा बाजोरिया नगर भाजपच्या माजी नगरसेविका मंगला सोनोनेचा पती गजानन सोनोने आणि त्याच्या गुंड प्रतीचे साथीदारांनी जागेच्या वादावरून बुद्धपाल सदाशिव यांना लोखंडी पाइपने मारून गंभीर जखमी केले होते. बुद्धपाल सदाशिव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या वेळी ॲड आंबेडकर यांच्यासोबत 'वंचित'चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर गजानन गवई किशोर जामणीक नितीन सपकाळ 'वंचित'चे पदाधिकारी कार्यकर्ते व माजी सैनिक उपस्थित होते.