बांधकाम साहित्याची ने-आण करणारी क्रेन उलटुन एक ठार तर एक जखमी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पुईखडी येथे पोतदार हायस्कुल जवळ असलेल्या छाया हाइटस बांधकाम साहित्याची ने-आण करणारी क्रेन बिमला धडकून उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत लक्ष्मण कुमार (वय 23 रा.सध्या पुइखडी ,मुळगाव छतीसगड) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा साडे तीनच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला तर किशन यादव (वय 45.मुळ रा.छतीसगड ,सध्या पुईखडी) हा जखमी झाला आहे.ही दुर्घटना मंगळवार दि.27/08/2024 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,पुईखडी येथे रणजित देवाळकर यांचे बांधकाम चालू असून यातील मयत व जखमी हे बलराम साहू आणि किशन साहु या ठेकेदाराकडे कामास आहेत.या ठेकेदाराकडे सात ते आठ कामगार कामास असून यातील सहा जण आत काम करीत होते.तर जखमी हा क्रेन ड्रायव्हर असून यातील मयत हा क्रेन मध्ये साहित्य भरण्यास खाली थांबला होता.साहित्य भरलेली क्रेन वर जात असताना तेथील बिमला धडकून उलटल्याने खाली थांबलेल्या कामगावर आदळल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.तर क्रेन चालक जखमी झाला.यातील मयत हा अविवाहित त्याच्या पश्च्यात आई वडील आणि एक भाऊ आहे.

Post a Comment

Previous Post Next Post