फकीर शाह समाजातील घुसखोरांना बाहेर काढावे..!

पुणे शहर मुस्लिम छप्परबंद भटकी विमुक्त समाज (विकास संस्था)

प्रेस मीडिया लाईव्ह :

आपण मुळ छप्परबंद समाजास सुनवणी करीता बोलविल्याबद्दल धन्यवाद. साहेब आपण अश्या समाजास छप्परबंद समाजास म्हणुण बोलवले ज्यांना राजकीय पाठबळ नाही. आर्थिक पाठबळ नाही. शिक्षणाचे प्रमाण  नाही, संघटीत नाही. काही तरूण वर्ग छप्परबंद समाजाची मुले व मुली शिक्षण घेत असल्यामुळे शासन दरबारी आमचे गाम्हाणे मांडत असतात पण गेली ३० वर्षांपासून *शाह फकीर* समाज विमुक्त जात्तीमधील छप्परबंद समाजाचे अशिक्षित असल्याचा फायदा घेवून राजकीय ताकद वापरून काही आमदारांना हाताशी धरून परीपत्रक काढून छप्परबंद समाजाचे संविधानिक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. पण शासकीय अधिकारी आमचे मायबाप ठरले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी वेळावेळी छप्परबंद समाजास सामाजिक अधिकारांची जाणीव करून दिली आहे. त्याकरिता धन्यवाद


महोदय, छप्परबंद समाज हा इतिहासामध्ये नोंद करण्याजोगे स्वातंत्र संग्रामामध्ये कार्य केले असून त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रजांना गुन्हेगारी कायदा तयार करावे लागले तसेच सेटलमेंट (ओपन जेल) जिल्हयानुसार तयार करावे लागले. त्याची सरकारी दप्तरी नोंद मिळेल तसेच पुरावे आमच्याकडे असून सोबत जोडत आहे. महोदय शाह फकीर समाज हा वेळो वेळी काही आमदारांना सोबत घेवून खोटा इतिहास सांगून १९९१ पासून परीपत्रक काढून मुळ छप्परबंद समाजाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केले, आम्ही १९९१ पासुन ते आत्तापर्यंतचे परीपत्रक रद्द करण्याकरीता नागपूर खंडपीठाकडे याचीका दाखल केले. दाखल याचिके नुसार नागपुर खंडपीठाने शहा फकिर यांचे सर्व परीपत्रक रद्द करण्यास शासनास आदेश दिले. आदेश दि. १५/५/२०१५ परीपत्रक सोबीसी/१०/२०११ क १३५ असून ते सोबत जोडत आहे. क


तसेच ब्रिटीशांनी खोटेनाणी छापण्याचा व्यवसाय बंद करण्याकरीता छप्परबंद समाजास सेटलमेंट (बंदीस्त कारागृह) उभे करून छप्परबंद समाजासह भामटा कैकाडी, पामलोर, घंटीचोर, पारधी अशी ७ जमातीला बंदीस्त ठेवले होते. त्यामध्ये शहा फकीर समाज कुठेही नव्हता, शहा फकीर हा समाज एनटीडी भटक्या मध्ये ३७ नंबरवर आहे. ओबीसी फकीर अनु क ३३५ वर आहे. तरी पण विमुक्त जाती (अ) मधील १४ नंबर छप्परबंर समाजाचे आरक्षण घेण्याचा डाव शहा फकिर समाजाची आहे जेणेकरून विमुक्त जाती मधील अन्य १३ जातींवर आरक्षणावर हल्ला आहे तरी आपणांस नम्र विनंती करात आहे की शाह फकीरा यांच्यी मागणी हि चुकीची आहे व  शासनाची फसवणूक असून त्याची मागणी अशी आहे की ज्यांच्या नावापुढे शहा किंवा फकीर असेल तेच मुळ छप्परबंद.  त्यानुसार भारताचे गृहमंत्री अमितजी शहा तसेच फिल्मस्टार नसरू‌द्दीन शहा हे पण छप्परबंद संबोधले जातील ही मागणी फार हस्यास्पद असून आपण मायबाप सरकार व शासन अभ्यासपुर्ण संशोधन करून छप्परबंद समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे ही विनंती.

*सदर बैठकीला* संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंमद इंडिकर, ताहेराबी शेख, अब्दुल भोलावाले, हासिम छप्परबंद, कवी हमिद राजेसाब शेख, रज्जाक (जनाब) शेख, अल्ताफ पिरजादे, समिर शेख, हुसैन राजनाळ, नबी इंडिकर, रफिक मैला शेख, फिरोज नरसणगी, युसुफ शेख, सय्यदअली छप्परबंद, फारुक नद्दीवाले व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


अधिक माहिती साठी संपर्क 

9881677091

8855000520

Salim shaikh

Post a Comment

Previous Post Next Post