राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,(NDA) पुणे मधील बाधितांना पुनर्वसित दाखला मिळावा. - आप ची मागणी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :   राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) खडकवासला,पुणे उभारणीसाठी कोंढवे धावडे गाव, कोपरे गाव,अहिरे गाव,उत्तमनगर, शिवणे येथील ग्रामस्थांची शेती योग्य जमीन ही देशाच्या संरक्षणासाठी उभारलेल्या प्रबोधिनी साठी 1950 साली घेण्यात आली त्या बदल्यात काही ग्रामस्थांना या संरक्षण प्रबोधनी मध्ये नोकरी सुद्धा देण्यात आली पण सध्या अशा प्रकारच्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्रकर्षाने वगळले जाते.

           आपल्या शेतजमिनीवर उभ्या असणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मुळे देशाच्या संरक्षणासाठी लागणारे अधिकारी या प्रबोधिनी मधून जातील आणि आपल्या या खडकवासला भागाचं नाव मोठं होईल तसेच देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जमिनीवाटे  का होईना एक पुण्याचे काम आपल्या हातून होईल या विचारांनी स्थानिक ग्रामस्थांनी आपली शेती ही संरक्षण प्रबोधिनी उभी करण्यासाठी सरकारला दिली.

          महाराष्ट्रात धरणा साठी बाधित असणाऱ्या ग्रामस्थांना पुनर्वसन दाखले मिळतात जेणेकरून पुनर्वसनांसाठी आरक्षित असलेल्या सरकारी नोकरी व इतर सुविधांसाठी त्या पुनर्वसन दाखल्यांचा वापर होतो.धरणांसाठी बाधित शेत जमीन आणि देशाचे संरक्षणासाठी उभारलेल्या संरक्षण प्रबोधिनी साठी बाधित शेत जमीन या दोन्ही ही  बाब एकच असल्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये गेलेल्या बाधितांना धरण प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर पुनर्वसन दाखला मिळावा अशी मागणी आप पुणे शहर उपाध्यक्ष श्री निलेश वांजळे यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देऊन केली. 

            यावेळी उपस्थित पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती सुरेखा भोसले, वैभव टेकाळे, सागर कानगुडे, रॉबिन जेम्स हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post