कै.बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना पुणे मनपा.औंध रोड या दवाखान्यात रूग्णांना दर्जेदार सुविधा औषधे उपचार तातडीने पुरवा..फिरोज मुल्ला (सर)

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

    पुणे.. शेवाळे दवाखान्या मध्ये रूग्णांना दर्जेदार सुविधा औषधे उपचार तातडीने मिळण्याकरिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) व सौ.शकीलाताई फिरोज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जनहितार्थ रूग्ण हक्क आंदोलन घेण्यात आले.

 या दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना ज्या पद्धतीने दर्जेदार उपचार मिळले पाहिजे तसे मिळत नाहीत जे उपचार दिले जातात ते आपूरे स्वरूपाचे आहे सुविधांची कमतरता भासत असल्यामुळे गरोदर महिला, वयवृद्ध नागरिक, लहान मुले मुली महीला पुरुष यांना पर्याय म्हणून खासगी महागडे दवाखाने निवडावे लागतात याचा नाहक आर्थिक स्वरूपात त्रास सहन करावा लागत आहे म्हणून खालील मागण्या तातडीने पुरवाव्यात ..

(1) सोनोग्राफी मशीन, ऐक्स-रे मशीनची सुविधा मिळाली पाहिजे

(2) हात पाय फ्रँक्चर झाल्यास प्लँस्टरची सुविधा मिळाली पाहिजे

(3) डॉक्टर यांचेकडून टेटोस्कोप व थर्मामिटर लावून रूग्णांना तपासले पाहिजे 

(4)हातपाय डोक्याला लागल्यास दर्जेदार औषधासहीत ड्रेसिंग करून मिळाले पाहिजे

(5)नेत्र तपासणी झाली पाहिजे

   या आंदोलनामध्ये रिपाई नेते संजय कांबळे, अल्पसंख्याक विकास महसंघाचे संस्थापक अध्यक्ष रफीकभाई कुरेशी, रिपाई मातंग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद घेडे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष जिवन घोंगडे,शिव भिम शिव क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आरुण भिंगारदिवे,  पँथर आँफ इंडिया या पक्षाचे प्रदेश कार्यध्यक्ष ईलियासभाई शेख, भिम साम्राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या महिला प्रदेश संघटीका ज्योतीताई झरेकर,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे,मिनाभाई पिल्ले, रमेश खरात, महेबुब शेख, आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

  या आंदोलनालचे आयोजन संदिपभाऊ शेंडगे, आलताफभाई शेख, हासिमभाई खान,जराल्ड डिसोझा,  रईसभाई खान,प्रियाताई यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post