प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : पंचगंगा नदीस येणाऱ्या पुरामुळे पंचगंगा नदी तीरावरील स्मशानभूमी मध्ये पुराचे पाणी येते.त्यामुळे त्याठिकाणी अंत्यसंस्कार करता येत नाहीत.यावेळी अंत्यसंस्कारा साठी शहरातील शहापूर येथील स्मशानभूमीचा वापर केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी सह जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने पंचगंगा स्मशानभूमी बंद करणेत आलेली असुन अंत्यसंस्कार विधी करीता शहापूर येथील स्मशानभूमीचा वापर सुरू करणेत आलेला आहे.
या ठिकाणी रात्री अति पाऊस, वारा, यामुळे महावितरण द्वारे वीजपुरवठा खंडित केला जातो अथवा सदर परिस्थिती , वातावरणामुळे तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित होतो व पर्यायाने त्यावर आधारित स्ट्रीटलाईट बंद पडते. तरी अशा वेळी पुरेसा विद्युत पुरवठा स्मशाभूमीतील परिसरात राहणे आवश्यक असल्याने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी प्रथम प्राधान्याने शहापूर स्मशानभूमी परिसरात सोलर हायमास्ट दिवा बसविणेच्या सुचना उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिलेल्या होत्या. सदर सुचनेनुसार उपायुक्त यांनी विद्युत अभियंता संदीप जाधव यांना आदेश दिले होते.
या अनुषंगाने शहापूर स्मशानभूमी परिसरात हायमास्ट बसविणेत आलेले आहेत.