कोथळी, दानोळीकरांचा एकमुखी पाठींबा
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/ प्रतिनिधी:
सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्था चालविणे खूपच अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत श्री दत्त साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ऊस विकासाच्या विविध योजना राबवून, सभासदांचे हित लक्षात घेऊन, गणपतराव पाटील हे सहकाराला बळकटी देण्याचा चांगला प्रयत्न करीत आहेत. निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित असून बिनविरोध झाली नाही तरीही गणपतराव पाटील यांच्या पाठीशी यड्रावकर गट आणि संपूर्ण कोथळी गावचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही संजय नांदणे यांनी दिली.
कोथळी (ता. शिरोळ) येथे सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. संवाद सभेच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब जकाप्पा हे होते.
दिलीप मगदूम यांनी महाराष्ट्रामध्ये दत्त कारखाना अतिशय नियोजनबद्ध आणि उत्कृष्टरित्या चालविला जात असल्याचे सांगून सभासदांनीच आता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि निवडणुक लावून चांगल्या कार्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहन केले. भीमगोंडा बोरगावे यांनी कोथळीकर नेहमीच चांगल्याच्या पाठीशी राहतात असे सांगून क्षारपडमुक्त कामाचे कौतुक केले. पंचायत समिती माजी सदस्य राजगोंडा पाटील, संगीता पाटील कोथळीकर, आबा पुजारी यांनीही कोथळी सभासद गगणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची ग्वाही दिली.
गणपतराव पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, क्षारपड जमीन मुक्तीच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी जमीन शाबूत ठेवणे, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आणि सभासदांचे हित जपणे ही भूमिका घेऊन सत्तारूढ गट काम करीत आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माती, पाने, पाणी परीक्षण करण्याची यंत्रणा उभी केली आहे. ऊस तोडणी, वाहतूकदार, सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर, कामगार यांची बिले, पगार आणि गाळप उसाला 14 दिवसात एकरकमी रक्कम जमा केली जाते. आम्ही विश्वस्त म्हणून अतिशय चांगल्या पारदर्शक पध्दतीने कारभार करीत असून सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अशोक पुजारी यांनी स्वागत केले. आभार सुनिल मगदूम यांनी मानले. धनगोंडा पाटील, बाळासाहेब विभूते, रावसाहेब पाटील, बाबुराव पाटील, देवगोंडा पाटील, सरपंच विजय खवाटे, प्रकाश पुजारी, सदाशिव मगदूम, अशोक धनगर, राजू विभूते यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
उमळवाड येथे राजेंद्र प्रधान म्हणाले, स्व. सा. रे. पाटील यांनी वैज्ञानिक आणि पुरोगामी दृष्टीने सहकार चळवळीला बळकटी दिली, शेतकऱ्यांचे हित जोपासले. त्यानंतर गणपतराव पाटील यांनी विकासाचे मॉडेल तयार करीत साहेबांच्या विश्वासार्हततेची परंपरा जोपासत श्री दत्त शेतकरी विकास पॅटर्न तयार केला आहे. यावेळी संजय पाटील कोथळीकर, पप्पू चौगुले, कलगोंडा पाटील, चवगोंडा पाटील, संजय पाटील, प्रभाकर चौगुले, रमेश चौगुले, अजित चौगुले, आप्पासो पाटील, सुभाष पाटील, मिलिंद मगदूम, शरद पाटील, बाळासो मगदूम, विद्याधर कर्वे, सुभाष रई आदी उपस्थित होते. मनोहर चौगुले यांनी आभार मानले.
दानोळी येथे बोलताना रावसाहेब भिलवडे म्हणाले, योग्य वेळी, योग्य पावले टाकून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होईल हे पाहून गणपतराव पाटील काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी दानोळीकर पूर्ण ताकदीने राहतील. महादेव धनवडे म्हणाले, विनाकारण बदनाम करणे, चुकीचे आरोप लावणे, निवडणूक लावणे, खर्चात पाडणे, वाटेल ते बोलणे आणि सभासदांची दिशाभूल करण्याचे, चुकीचे काम विरोधी लोक करीत आहे. असे आरोप सहन न करता त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. सर्जेराव शिंदे, संदीप पाराज, केशव राऊत यांनी मनोगतातून गावचा पाठिंबा दिला. आभार सुरेश माणगावे यांनी मानले. विकास वाळकुंजे, संदीप पोवार, बाळासाहेब भोसले, विलास काटकर, वसंत पिसे आदी शेतकरी उपस्थित होते.
कवठेसार येथे महालिंग पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. बशीर पटेल, राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष पाटील, रावसाहेब दत्तू पाटील, कासिम मुल्लाणी, विलास पाटील, काडगोंडा पाटील, बापूसो माने, रावसो मलगोंडा पाटील, भाऊसो फरांडे यांच्यासह शेतकऱ्यांनी सत्तारूढ पॅनेलवर विश्वास व्यक्त केला.
तमदलगे येथे रावसाहेब पुजारी, शिवाजी पोळ, संग्रामसिंह देसाई, संजय खराडे, महेंद्र बागे, नितीन बागे, राजगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, शंकरराव शिरसटे, शामराव पुजारी, सुरगोंडा पाटील, सपना कांबळे, हेमंत आवटी आदी उपस्थित होते. तर निमशिरगाव येथे अजित सुतार, विक्रम चौगुले, वसंत पाटील, शितल पाटील, के. पी. पाटील उपस्थित होते. तसेच जैनापूर येथे सुनील रजपूत, महादेव राजमाने, निळकंठ राजमाने, बापूसो पाटील, प्रमोद राजमाने, उदयसिंह रजपूत, विष्णू कोळी, अनिल रणनवरे, सुभाष घाटगे, सुरेंद्र खामकर, डॉ. दगडू माने, सविता पाटील कोथळीकर, संभाजी खामकर, आप्पासो चौगुले, सुरेखा रजपूत, शक्तीकुमार पाटील, राजेंद्र ऐनापुरे, सुधाकर राजमाने, विजय रजपूत, शरद रजपूत, राजगोंडा पाटील, तुकाराम राजपूत, शिवाजी सुतार आदी शेतकरी उपस्थित होते. चिपरी आणि आगर याठिकाणीही संवाद दौऱ्यात सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.