मेघदूत मधील काव्य रचनांमधून समाजात प्रेम,ममत्व अपेक्षित कालिदास दिन कार्यक्रमात प्रो. त्रिपाठी यांचे प्रतिपादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

छत्रपती संभाजीनगर ः  महाकवी कालिदासांच्या मेघदूत मधील काव्यरचनांमधून समाजात प्रेम, ममत्व अपेक्षित आहे असे मत भोपाळ येथील महर्षी वैश्विक विश्वविद्यालयाचे आचार्य प्रो. निलिम्पा त्रिपाठी यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कालिदास दिनानिमित्त 'आषाढस्य प्रथम दिवसे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ लेखक बाबा भांड हे होते. यावेळी व्यासपीठावर हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डाॕ. शीतलाप्रसाद दुबे, साहित्य भारतीचे संघटन मंत्री नितीन केळकर, प्रदेशाध्यक्ष दत्ता जोशी, अकादमीचे सचिव सचिन निंबाळकर,प्रा.  भारती गोरे यांची उपस्थिती होती आपल्या भाषणात त्रिपाठी यांनी कालिदासांच्या काव्याचा आढावा घेतला. वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराची पौराणिक कथा विशद करून छत्रपती संभाजीनगरचा परिसर हा महादेवाच्या स्पर्शाने  पुनित झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अध्यक्षीय भाषणात बाबा भांड यांनी साहित्य भारतीच्या उपक्रमाला शुभेच्छा देत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर भाष्य केले. केळकर यांनी साहित्य भारतीच्या राज्यात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व साहित्य भारतीचे कार्य विस्तारण्याची गरज प्रतिपादन केली. छत्रपती संभाजीनगरची जिल्हा कार्यकारिणी त्यांनी घोषित केली. प्रास्ताविक दत्ता जोशी तर आभार सचिन निंबाळकर यांनी मानले. दुस-या सत्रात नवनाथ पवार लिखित 'साहित्य सागर कालिदास' या लघुनाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. श्रमशक्ती कला अविष्कार संस्थेचे कलाकार यात सहभागी झाले होते. नागनाथ काजळे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post