डॉ.गोविंद पानसरे खून खटल्यातील आरोपी डॉ.विरेंद्र तावडे यांचा जामीन रद्द.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-ज्येष्ठ कामगार नेते डॉ.गोविंद पानसरे यांच्या खूनातील मुख्य संशयीत आरोपी डॉ.विरेंद्र तावडे यांचा जामीन रद्द करून त्याला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश मंगळवार दि.16/07/2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.तांबे यांनी दिले.                                          

   या खुन खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस.एस.तांबे यांच्या कोर्टात चालू असून यातील मुख्य सूत्रधार संशयीत आरोपी डॉ.विरेंद्र तावडे यांचा 2018 साली जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.पण डॉ.तावडे यांच्या विरोधात पुरावे मिळाले असल्याने त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केली होती.पोलिसांनी या खून प्रकरणातील दहा संशयीत आरोपीना अटक केली असून त्या पैकी समीर गायकवाड याला जामीन मंजूर झाला आहे.दुसरा संशयीत 2018 ला डॉ.विरेंद्र तावडे यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

या प्रकरणी विशेष सरकारी वकील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने जामीना बाबत जिल्हा न्यायालयातच सुनावणी व्हावी .असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.त्यानुसार डॉ.तावडे यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारी वकील यांनी दाखल केला होता.डॉ.तावडे यांचा मारेकरयाशी संपर्कात राहून त्यांना प्रशिक्षण देऊन गुन्ह्यात वापरलेले शस्त्र त्यानेच पुरविले होते.त्यांच्या बरोबर बैठका घेऊन खूनाचा कट रचण्यात डॉ.तावडे यांचा सहभाग असल्याने तेच यातील मुख्य सुत्रधार असल्याने त्यांना जामीन मिळू नये म्हणुन सरकारी वकील यांनी जोरदार युक्तीवाद केला होता.त्या वेळी न्यायालयाने या अर्जावरचा निकाल राखून ठेवला होता.तो अर्ज आज निकाली काढ़ुन सरकार पक्षातर्फे मे.कोर्टात निदर्शनास आणलेल्या अनेक बाबी आणि सादर केलेले पुरावे यांचा विचार करून डॉ.तावडे यांचा जामीन अर्ज रद्द करून त्याला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश ए.टी.एस.पथकाला दिले.त्यानुसार ए.टी.एस.पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन त्याची रवानगी जेल मध्ये केली आहे.

या कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील Ad.हर्षद निंबाळकर आणि Ad .शिवाजीराव राणे यांनी जोरदार युक्तीवाद केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post