पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन

 जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी यांना विविध  मागण्यांचे निवेदन दिले.

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा - आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणा करण्यात आलेले आहेत.

प्रेस मीडिया लाईव्ह :

साप्ताहिक वृत्तपत्रांसह दैनिके, न्युज चॅनल व इतर प्रसारमाध्यमांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी देशात क्रमांक एक वर असलेल्या व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने ४ जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनात, राष्ट्रीय संघटक परवेज खान व साप्ताहिक विंगचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कय्यूम  यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष डॉ शकील शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.


  निवेदनात नमूद आहे की, राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, न्युज चॅनल, न्युज पोर्टल, युट्युब पोर्टल आदींच्य विविध मागण्यांसंदर्भात व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने संपुर्ण राज्यात एकाच वेळी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत धरणे आंदोलने राबविण्यात आले. त्यानुसार पत्रकारांच्या मागण्या आज रोजी शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून पत्रकारांवर अन्याय केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांच्या मागण्यांमध्ये, आगामी विधानसभा निवडणुकीत, सनावर,उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक व साप्ताहिक असलेल्या लोकाभिमुख न्यूज पोर्टल, चैनल, युट्युब चॅनलला  पण देण्यात यावे. सर्वांना समान न्याय न्यायाने  जाहिरातीचे वाटप करण्यात यावे, शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना ही देण्यात पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना दिव वार्षिक तपास त्यातून वागण्यात यावे तसेच 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाच्या विशेष जाहिरात देण्यात टीव्ही मध्ये काम करणाऱ्या स्ट्रेंजर पत्रकारांना मानधन संदर्भातला ठोस निर्णय  घ्यावा. सरकारी आणि खाजगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बांधानाच्या बाबतीत शासनाने नियमावली ठरवून द्यावी. काळाप्रमाणे डिजिटल मीडियाने आपले पाऊल जोरदार टाकलेले आहेत जे न्यूज पोर्टल, न्यूज यूट्यूब चैनल  लोकाभिमुख अधिक लोक पण पोहोचले आहेत त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिरात देण्यात यावे. सेवानिवृत्त योजनेची वाढलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावे जे जे श्रमिक आहे.त्यांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेच्या लाभ मिळावा या प्रमुख मागण्या आहेत. काळाप्रमाणेदैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे.साप्ताहिक साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी. पत्रकारांना  रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी.  आरएनआय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. दैनिकांप्रमाणे साप्ताहिकांना विशेष प्रसिध्दीच्या जाहिराती देण्यात याव्या. सर्व दर्शनी जाहिरातीचा देण्यात यावा. अधिस्विकृतीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या. कोरोनापासून बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासातील सवलत पुर्ववत सुरु करण्यात यावी. न्युजप्रिंट वरील जीएसटीची अट रद्द करण्यात यावी. सर्व साप्ताहिकांना शासन निर्णयानुसार जाहिरात देण्यात याव्या, आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

 या प्रमुख मागण्या आहेत.हे आंदोलन शांतताने आम्ही केलेला असून या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने  नियमवली नाही केली तर येत्या 10 जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

यावेळी परवेज खान,अब्दुल कयूम, गणेश पवार, सुजित ताजने,शारेक नक्शबंदी, सावेश जाधव, ॲड सय्यद मोईन,सय्यद शब्बीर, सय्यद करीम, शाकेर चिस्ती, मोहम्मद इसाकोद्दीन, अनीस रामपुरे,शेख इलियास, शेख रफिक, नेहा खान, अब्दुल गणी, शफी मिर्झा, प्रभाकर पाटणे, गणेश महाले, मेराज खान, सय्यद लायकोदिन, अजमत पठाण, शेख मोहसीन, दिशा सुरवसे पाटील, डॉक्टर शकील शेख, काझी नाझीमुद्दीन, हसन शहा, सारंग बोराडे, शेख अब्दुल जब्बार, मोहसीन खान, फैयाज सौदागर,जफर खान जब्बार खान,नदीम सौदागर, सुरेश शिरसागर,अकलाक देशमुख, सदिक अली, जावेद पटेल, शेख सईद, एयफाझ खान, उमेश जोशी, सय्यद फिरोज, प्रभाकर पटने,बबन सोनवणे, रतन कुमार साळवे, सलीम पटेल वाहेगावकर, राजु प्रधान, प्रल्हाद गवळी, झाकेर सिद्दीकी, असलम खान, जावेद खान, शेख कलीम आरेफ देशमुख आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post