प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/ प्रतिनिधी:
कर्नाटक व सीमा भागातील कागवाड, शेडबाळ, जुगुळ, शिरगुप्पी, मंगावती, शहापूर येथील शेतकरी सभासदांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला एकमुखी पाठिंबा देऊन पॅनेल भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प जाहीर केला. श्री दत्त कारखान्याने गेल्या दहा वर्षात मोठी प्रगती केली असल्याने 'तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे ठामपणे आहोत', अशी ग्वाही सभासदांनी दिली
कागवाड येथे झालेल्या संवाद दौऱ्यात व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई म्हणाले, कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान दत्त कारखान्याने विकसित केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडी अडचणी यातून मार्गदर्शन करत, सल्ला देऊन एकरी 200 टनाचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहनपर 6100 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. गणपतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखाना उत्तमरीत्या सुरू असून सत्तारूढ पॅनेलला सभासदांनी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी.
अरुण जोशी म्हणाले, निवडणूक एकतर्फी झाल्यासारखीच आहे. शेतकरी सभासदांच्या समस्या ऐकून घेणे, त्याच्यावर विचार करणे आणि त्याचे निराकरण करण्याचे काम गणपतराव पाटील नेहमीच करीत असतात. स्व. सा. रे. पाटील साहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम त्यांच्या हातून होत असून शेतकऱ्यांची प्रगती होत आहे. अध्यक्षीय भाषणात बी. जे. पाटील म्हणाले, सभासदांचा हक्काचा कारखाना म्हणजे श्री दत्त कारखाना असे समीकरण झाले आहे. स्व. सा. रे. पाटील आणि पुढे गणपतराव पाटील यांनी कारखान्यांमध्ये राजकारण न करता, इर्षा न करता कारखाना शाबूत ठेवण्याची भूमिका पूर्वीपासूनच घेतली आहे. सत्तारूढ पॅनेल पुन्हा एकदा निवडून येणार यात शंकाच नाही. सभासदांबद्दल गणपतराव पाटील यांना मोठा कळवळा असून त्यांच्या स्तुत्य कामामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत.
गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम सत्तारूढ गट नेहमीच करीत असल्यामुळेच आणि सत्तारूढ गटाची भूमिका शेतकऱ्यांना रुचलेली आणि पटलेली असल्यामुळेच सभासदांचा विश्वास आम्हाला मिळत आहे. या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा आम्हाला शेतकरी हितासाठी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले. सूत्र संचालन अशोक पाटील यांनी केले. राजू शिरगुप्पी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी संचालक अमर यादव, महेंद्र बागे, ज्योतीकुमार पाटील, सुभाष कताळे, सुभाष कटारे, अजित चौगुला, सुधीर हुद्दार, बी. ए. पाटील, अजित चौगुले, अमर शिंदे, नेताजी काटे, बाबु सय्यद यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आभार रावसाहेब कल्लोळे यांनी मानले.
शेडबाळ येथे नेमगोंडा नरसगौडर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. संचालक इंद्रजीत पाटील म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम आठ महिन्यात पूर्ण करून जास्तीचा ऊस गाळप करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय गणपतराव पाटील यांना जाते. आठ हजार पाचशे एकर क्षारपड जमिनीवर क्षारपडमुक्तीचे काम उत्तमरीत्या झाले असून शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात यश आले आहे. सत्तारूढ गटाला सभासदांनी पुन्हा एकदा मतदान करून काम करण्याची संधी द्यावी. राजेंद्र प्रधान म्हणाले, नैसर्गिक आपत्ती, महापूर आणि कोरोना काळात कारखान्याची अर्थव्यवस्था समर्थपणे पेलण्याचे कार्य गणपतराव पाटील यांनी केले आहे. राजकारणाचा आखाडा न करता शेतकरी विकासाचा आराखडा तयार करण्याची भूमिका गणपतराव पाटील यांची आहे. शाश्वत ऊस विकासाचा श्री दत्त पॅटर्न आज देशभरात नाव लौकिक मिळवत आहे. बाबासाहेब सौन्दती यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कुमार मालगावे यांनी केले. यावेळी अजित नरसगौडर, सौरभ पाटील, बाबासाहेब नांद्रे, राजू नांद्रे, भरतेश नांद्रे, महावीर साबन्नावर, रावसाहेब पल्लखे, आण्णासाहेब आरवाडे, चंद्रकांत जाधव, विनोद बरगाले, सुरगोंडा पाटील, कुमार सदलगे, विजय कुडचे, कुमार पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
जुगुळ येथे मल्हारपंत दत्तोपंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. स्वागत व प्रास्ताविक आण्णासाहेब पाटील यांनी केले. अनिल मिनचे यांनी सूत्रसंचालन केले. कलगोंडा पाटील, बाबुराव जाधव यांनी मनोगतातून जुगुळ, मंगावती, शहापूर येथील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला. यावेळी अनिल कडोले, प्रमोद पाटील, रावसाहेब देसाई, तात्यासाहेब पाटील, गोपाळ खोत, नेमिनाथ मगदूम, जयपाल यमकनमर्डी, बसवराज नंदाळे, बाबुराव जाधव, काकासाहेब पाटील, असलम अपराज, राजगोंडा पाटील, गिरीष पाटील, महेबूब किल्लेदार आदी शेतकरी उपस्थित होते.
शिरगुप्पी येथे सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. काडगोंडा पाटील, प्रकाश जाधव, इकबाल कनवाडे, अजित कागवाडे, इरगोंडा पाटील, राजेंद्र चौगुले, रामचंद्र वडर, बाबासो पाटील, प्रल्हाद पाटील, प्रकाश कांबळे, अण्णासो तमदड्डी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.