श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी: 

     शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तरच शेतकरी टिकेल. शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहे. शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत. यामुळेच श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा आहे. शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर सभासदांनी विश्वास दाखवावा, असे आवाहन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

   


    कुंभोज (ता. हातकणंगले) येथे कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित संवाद दौऱ्यात ते बोलत होते. महादेव कुंभार हे अध्यक्षस्थानी होते.

      गणपतराव पाटील पुढे म्हणाले, गोड फळे देणाऱ्या झाडालाच दगडांचा मारा सहन करावा लागतो. पण तरीही झाड फळे देणे बंद करीत नाही. त्याचप्रमाणे कारखानाही अनेक संकटे येत असतानाही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेऊन काम करीत आहे. आगामी काळात ड्रीप शिवाय पर्याय नाही हे ओळखून ड्रीप करणाऱ्या शेतकऱ्यांना 6100 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कारखाना देत आहे. सभासदांच्या अडचणी सर्वांगाने समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न संचालक मंडळ एकदिलाने करते आहे. एकरी 200 टनाचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रकारचे औषधे, खते आणि संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनांमुळे एकरी दहा ते पंधरा टनांची वाढ झाली आहे. दहा हजार एकरावर क्षारपड जमिन सुधारणेचे काम झाले असून तेथे ऊस उत्पादनही सुरू झाले आहे. ही गोष्ट विचारात घेऊन सर्व शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला यावा आणि वेळेत गाळप व्हावा हा दृष्टिकोन ठेवून विस्तारीकरणाचे काम केले आहे. अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जात आहे. माती, पाने, पाणी परीक्षणाची बांधावर सोय, सभासदांच्या कुटुंबीयांना अल्प दरात तज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. मी आपल्या सभासदांचा हक्काचा संचालक म्हणून काम करण्याची हमी देत आहे. विकासाची दृष्टी ठेवून काम करीत असल्यामुळे सभासदांनी सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

   प्रारंभिक स्वागत व प्रास्ताविक अजित साजनकर यांनी केले. यावेळी संचालक रघुनाथ पाटील, बाळासाहेब पाटील हलसवडे, सदाशिव कुलकर्णी, सुरेश पाटील, आप्पासो चौगुले, आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. धर्मवीर पाटील, विश्वास कोळी, महावीर पाटील, जावेद गवंडी, कामदेव पुजारी, पोपट भंडारी, विद्यानंद पाटील, सुरज पाटील, मुबारक मुजावर, आण्णासाहेब चौगुले, पांडुरंग कुंभार, बापूसाहेब ठोंबरे, आप्पासाहेब ठोंबरे, सुभाष जामदार ययांच्यासह कुंभोज, हिंगणगाव, नेज, नरंदे येथील शेतकरी उपस्थित होते.

     आळते येथे शितल हावळे, सुलेमान मुजावर यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि अडचणीवर मार्ग काढण्याचे आश्वासन गणपतराव पाटील यांनी दिले. आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी येथील शेतकरी सभासद उपस्थित होते.

      हातकणंगले येथे इंडोपंत इरकर यांनी श्री दत्त कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने सुरू असून विरोधकांनी कारखान्याची निवडणूक लावणे हे चुकीचे असल्याचे सांगून हातकणंगले व परिसरातील शेतकरी सभासदांचा पाठिंबा जाहीर केला. नूरमहंमद मुजावर यांनी शेतकऱ्यांना काय पाहिजे, त्यांच्या अडचणी काय आहेत, यादृष्टीने गणपतराव पाटील हे सामाजिक आणि विधायक कामे करीत आहेत. क्षारपड मुक्तीच्या कामामुळे जमिनीला नवे जीवन प्राप्त झाल्याचे सांगून पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्याचे आवाहन केले. शितल पाटील यांनी दत्त कारखान्याच्या ऊस विकास योजना व इतर योजनांचा लाभ कसा घेतला याची विस्तृत माहिती दिली. यावेळी सदाशिव कांबळे, आबासाहेब चौगुले, दादासो पाटील आदी उपस्थित होते.

   तारदाळ येथे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रसाद खोबरे म्हणाले, दत्त कारखान्याकडे आम्ही एक कुटुंब म्हणून पाहतो, त्यामुळे आम्हाला कारखाना आणि गणपतराव पाटील यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो. चांगले चालणारे कारखाने बंद पाडून आपण शेतकऱ्यांचे किती नुकसान करीत आहोत याचा विचार करून कारखाना लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वेळेत सर्व गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांना फायदा होईल. के. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुसा मुजावर यांनी स्वागत केले. सरपंच पल्लवी पोवार, गुरुकुमार पाटील, शिवगोंडा पाटील, भिमराव बंने, आण्णासो मगदूम, शंकर विभूते, मुसाली मुजावर, आबासो खांडेकर, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. आभार  भाऊसाहेब वास्के यांनी मानले.

     बारवाड येथे मारुती कोणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत धनाजी चौगुले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. राजेंद्र प्रधान यांनी दत्त कारखान्याच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले. आभार संचालक शरदचंद्र पाठक यांनी मानले. यावेळी संचालक रघुनाथ पाटील, इंद्रजीत पाटील, आण्णासाहेब चौगुले, शिवाजी शिंत्रे, मारुती कोणे, तात्यासो देसाई, नंदकुमार कुलकर्णी, शशिकांत अर्जुनवाडे, शिवाजी बाचणे, संभाजी चौगुले, धनाजी चौगुले, प्रमोद देसाई, दादासो चौगुले, पांडुरंग तिटवे, तातोबा कोल्हापूरे आदी शेतकरी उपस्थित होते.

    मांगूर येथे शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. पिंटू पाटील, आण्णासो जळणे, विनय बोधले, सरपंच राहूल प्रताप, सचिन बोधले, बाळासाहेब कुंभार, अरिहंत पाटील, बाळासाहेब जाधव, बबन पाटील आदी उपस्थित होते.

   यानंतर बेनाडी आणि कुन्नूर याठिकाणी झालेल्या दौऱ्यात सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post