Successful follow-up of Shekap leader Pritam Mhatre"
"शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा"
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता. हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
त्यावर कार्यवाही म्हणून त्वरित उलवे परिसरातील पाण्याची समस्या आणि इतर सिडकोची अपुरी विकास कामे यासंदर्भात समस्या निवारणासाठी त्यांनी रायगड भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यातून सकारात्मक निर्णय झाले त्यावर त्यांना त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार सिडको ने कार्यवाही केली आहे. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील पाण्याच्या कनेक्शन अभावी बंद असलेले शौचालय आज पाणी जोडणी झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आले आणि रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले सरत्या जिन्याचे काम पुढील दोन महिन्यातच पाठपुरावा करून सुरू करून असे सांगितले. गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या संख्येनुसार सकाळी आणि संध्याकाळी रेल्वेची फेरी वाढवण्यासाठी संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार पुढील काही दिवसातच नागरिकांना आवश्यकत्या सुखसुविधा उपलब्ध होतील यावर लक्ष दिले जाईल असे श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले आहे.
कोट
वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्या पत्रव्यवहारामध्ये अडकलेल्या रेल्वे स्थानकातील शौचालयाच्या पाणी जोडणीचा पाठपुरावा घेऊन आज काम पूर्ण झाले आणि नळाद्वारे टाकीत पाणी सुरू झाले. नागरिकांशी संवाद साधला असता परिसरातील अजूनही बऱ्याच गोष्टी सिडकोकडून होणे अपेक्षित आहे त्या पाठपुरावा करून लवकरच पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या कररूपी भरलेल्या पैशाने नागरीसुविधा मिळवून देणार - श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका