गरिबीला लाजू नका; शिक्षणात खंड पडू देऊ नका

सावित्री फोरमचेच्या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका स्वाती वानखडे यांचे आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आपण कोठे राहतो, काय खातो याचा विचार न करता मोठे होण्यासाठी सतत शिकत रहा. गरिबीची लाज बाळगू नका,  तुम्ही कुठे जन्मला आलात हे महत्वाचे नसून तुम्ही आयुष्यात काय करता हे महत्वाचे आहे. आपल्या कुटुंबाचे दारिद्र्य घालवण्यासाठी शिक्षण सुरू ठेवा. शिक्षणाने माणूस जिवंत राहतो, जिवंत राहण्यासाठी शिक्षणात खंड पडू देऊ नका, असा सल्ला आदर्श शिक्षका स्वाती वानखडे यांनी सावित्रीच्या लेकींना दिला. तुमचे शिक्षण सुरू राहावे म्हणून सावित्री फोरमचे कार्य करीत असल्याचे कौतुक यावेळी त्यांनी केले.

          ‘सावित्री फोरम’तर्फे आदर्श शिक्षिका सौ. स्वाती वानखेडे यांना आदिवासी पाड्यांमध्ये शाळा चालवून आदिवासी मुला – मुलींना गेली ३० वर्षाहून अधिककाळ शिक्षण देण्याचे  कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’ पुरस्कार माजी नगरसेविका नीला विजय कदम यांच्या हस्ते बुधवारी जवाहरलाल नेहरु सभागृहात देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  सावित्री फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोद्रे, सुप्रिया ताम्हणे यांच्यासह 

शितल कचरे, गायत्री लडकत, मेधा केवटे, शैला माळी, संयोगिता कुदळे, मोनाली कोद्रे, स्वाती वानखेडे, नीला कदम, दिपाली पांढरे, सुप्रिया ताम्हणे, अनिता ढोले-पाटील, अश्विनी बोरुडे,फोरमच्या, पदाधिकारी, सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

  याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यानिधी योजनेअंतर्गत ६ शाळांतील १०९  विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली. 

स्वाती वानखेडे म्हणाल्या, आदिवासी पाड्यांमध्ये

सावित्रीची पणती लावून मी शैक्षणिक कामाला सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचं काम करत असताना शेणगोळे खावे लागले. पण माझ्या कामाचा मला पगार मिळत होता त्याची ही मला लाज वाटत होती म्हणून पुराच्या पाण्यातून ही वाट काढत मी शाळेत जाऊन शिकवत राहिले. बाभळीच्या झाडाखाली मी शिकवलं. प्राथमिक शिक्षण हे आई सारखं असावं. आदिवासी पाड्यात काम करताना धो-धो पावसात  जंगलातून वाट काढत, तर कधी पुराच्या पाण्यातुन दरीतून  मी शाळेत पोचत होते. तेव्हा मला कोणतंही सरंक्षण नव्हतं पण याच शेरपाड्यात शाळेचं काम केलं, न्यूझीलंड ला पुरस्कार स्वीकारताना मात्र मला पोलीस संरक्षण मिळालं. केवळ हे शिक्षणामुळे होऊ शकते. सावित्री फोरमने दिलेल्या पुरस्काराने मला आणखी ऊर्जा मिळाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही शिक्षण घेत असताना आधार नव्हता, आज तुम्हाला सावित्री फोरम च्या माध्यमातून शैक्षणिक आधार मिळत आहे. गरिबीला न डगमगता खडतर परिश्रम करा, अभ्यासात सातत्य ठेवा यश नक्की मिळते. मोबाईलच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही यावेळी विद्यार्थ्यांनींना दिला. तुमच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम सावित्री फोरम करीत आहे, याचा लाभ तुम्ही घ्यावा, असे आवाहन यावेळी वानखडे यांनी केले. 

नीता कदम म्हणाल्या, आठवी ते दहावी हे वय पुढे जाण्याचे आहे,त्यामुळे विद्यार्थिनींनी आपलं आयुष्य घडवण्यासाठी सतत अभ्यास करायला हवा. रडत बसायचं नाही मला अनेकांचे आयुष्य घडवायचे आहे या ध्येयाने शिक्षण आपण घेतले पाहिजे. स्पर्धेच्या युगात शिक्षणाची खूप गरज आहे. काहीच नसेल तर आपण ते शिक्षणाने मिळवू शकतो. आयुष्य सुंदर जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे शिक्षण घ्या, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. आपल्या पाठीमागे सावित्री फोरम आहे, त्यामुळे आपण सतत पुढे जाण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. 

मोनाली कोद्रे म्हणाल्या, सावित्री फोरमच्या वतीने गरजू  विद्यार्थिनिंना सावित्रीबाई फुले उद्यान येथे योजने अंतर्गत अंतर्गत मुलींना आर्थिक मदत केली जाते सहा शाळातून 109 मुलींना विद्यानिधी देण्यात आली आहे. याबरोबरच आरोग्य शिबिर व विविध उपक्रम राबवण्यात येतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बोरुडे व कादंबरी रासकर यांनी केले.

गायत्री लडकत, संयोगीता कुदळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आम्ही सावित्रीच्या लेकी भय नाही आम्हा कोणाचे हे गीत यावेळी फोरमच्या सदस्यांनी सादर केले. सुप्रिया ताम्हणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सावित्री फोरमच्या कार्याचा आढावा घेतला.

फोटो ओळ : सावित्री फोरम’तर्फे आदर्श शिक्षिका सौ. स्वाती वानखेडे यांना  ‘सावित्री’ पुरस्कार माजी नगरसेविका नीला विजय कदम यांच्या हस्ते बुधवारी जवाहरलाल नेहरु सभागृहात देण्यात आला. यावेळी (डावीकडून) शितल कचरे, गायत्री लडकत, मेधा केवटे, शैला माळी, संयोगिता कुदळे, मोनाली कोद्रे, स्वाती वानखेडे, नीला कदम, दिपाली पांढरे, सुप्रिया ताम्हणे, अनिता ढोले-पाटील, अश्विनी बोरुडे.

------    

 

Post a Comment

Previous Post Next Post