ससून हॉस्पिटल रुग्णालयाचा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ससून रूग्णालयातील अधिष्ठाता यांना निवेदन सादर.




  प्रेस मीडिया लाईव्ह  :                          

  

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ससून सर्वोपचार रूग्णालय येथील अधिष्ठाता यांना शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.

    

 ससून रूग्णालय हे गरीब आणि मध्यम वर्गींयासाठी आहे. परंतु दिवसेंदिवस ससून रूग्णालयातून वेगवेगळ्याच बातम्या बाहेर येत आहे. म्हणजे ससूनमध्ये नक्की शिजते तरी काय? ललित पाटील गांजा प्रकरण, उंदीर चावून एका रोग्याचा मृत्यू होणे, गुन्हेगारांना VIP ट्रिटमेंट मिळणे, कल्याणी नगरमधील ब्लड रिपोर्ट बदलण्याचा प्रकार आणि आता चक्क निराधार रूग्णाला निर्जन स्थळी फेकून देण्याचा प्रकार. हे प्रकरण जेव्‍हा आता उघडकीस आल्या नंतर असे वाटते की, गेले कित्येक दिवस कित्येक रूग्णांना हे असेच टाकून येत असतील. खरे तर जे डॉक्टर होतात त्यांना एक शपथ घ्यावी लागते पण हे असे निर्दयी क्रुर डॉक्टर पुजा खेडकर सारखेच पास झाले आहेत का. पुणे शहराच्या आजूबाजूंच्या ६ जिल्ह्यातून गरीब नागरिक उपचारासाठी ससूनमध्ये येतात आणि जर त्यांच्या जीवाशी डॉक्टर खेळत असतील तर ते कदापी आम्ही सहन करणार नाही. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य ज्या डॉक्टरांनी केले ते अभ्यास करून डॉक्टर झाल्यासारखे वाटत नाही. म्हणून त्यांची डॉक्टर ही पदवी रद्द करण्यासाठी शिफारस करावी. अशा प्रकारची मागणी या निवेदनाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.

    
 यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर, लता राजगुरू, संगीता तिवारी, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, सुजाता शेट्टी, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, रजिया बल्लारी, बेबी राऊत, राज अंबिके, रवि पाटोळे, हेमंत राजभोज, फिरोज शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post