बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे ने अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची केली फसवणूक

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील लोणी काळभोर परिसरात  बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे या महिलेने अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिलेने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दरमहा दहा टक्क्याने पैसे उकळले आहेत. या प्रकरणी रेणुका करनुरेच्या विरोधात एका 31 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.


यापीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने बनावट आयएस अधिकारी रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये दिले असताना सुद्धा रेणुका हिने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी करत पिढीतील त्रास देत धमकवण्यास सुरुवात केली. 


"मी आयएएस अधिकारी आहे, माझ्या नादाला लागू नको. तुला कामाला लावेन, माझे पैसे तू ताबडतोब दे" असं म्हणत धमकवण्यास सुरुवात केली. या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने  लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रेणुकाची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post