लाडक्या बहिणीला मदत करून लाडक्या दाजींचा आर्थिक छळ

  मोबाईल कॉलिंग चे दर वाढवून सर्वसामान्यांची मोबाईल कंपन्यांकडून पिळवणूक... 



प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पक्षाच्या वतीने आज बालगंधर्व चौक या ठिकाणी केंद्र सरकारच्या मालकीची असलेली दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल या सरकारी कंपनीची दुरावस्था करून खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचून देण्याच्या प्रवृत्तीचा आंदोलनाद्वारे निषेध केला गेला. केंद्र सरकारने बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे या कंपनीचे लाखो ग्राहक दूरसंचार क्षेत्रातील जिओ, एअरटेल, व्ही यासारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे गेल्या काही वर्षात वळले असून आता या कंपन्यांनी देत असलेल्या सेवांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या लुटण्याचे काम सुरू केलेले आहे. भाजप सरकारने केलेल्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कंपन्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीला सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसून हा सर्व प्रकार म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखा आहे. खरे पाहता सरकारी क्षेत्रात बीएसएनएल सारखी मोठा ग्राहक वर्ग असलेली कंपनी असताना देखील तिला अद्ययावत ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात केला गेला नाही. या उलट खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना मोठमोठ्या सवलती देऊन बीएसएनएल कंपनीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलेला आहे.

केंद्र सरकारने सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल कंपनीच्या सेवा सुधाराव्यात जेणेकरून सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल कंपनी व खाजगी क्षेत्रातील कंपन्या या एकमेकांशी स्पर्धा करू शकतील जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या दूरसंचार सेवा योग्य त्या दरात मिळतील. परंतु असे न झाल्यास खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची मक्तेदारी तयार होऊन त्या ग्राहकांना त्यांच्या सेवा महागात घेण्यास भाग पाडतील ज्याचा सरळ सरळ फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. असा आरोप यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला.

श्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्या सरकारी कंपन्या विकल्या किंवा मोडकळीस आणल्या. BSNL सारख्या मोठ्या कंपन्या चे नेटवर्क, कार्यालये, इन्फ्रा जिओ सारख्या कंपनीला विकले. 

अश्या खासगीकरणाचा फटका सामान्य जनतेला बसू लागला आहे. मोबाईल रिचार्ज दरवाढ 25% ने करणे म्हणजे खासगीकरणातून मनमानी कारभार आहे. अत्ता सरकार चे काहीही नियंत्रण नाही. ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी आप ने आंदोलन केले. -  सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष

मोबाईल वापरकर्त्यांमध्ये जगामध्ये आपण आता दोन नंबरला पोहोचलो असून 100 कोटी वापरकर्ते आहेत. असे असताना केवळ अतिरिक्त नफेखोरी साठीच रिचार्ज दरवाढ झालेली आहे. टेलिकॉम रेगुलरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ही दरवाढ मागे घेणे घेण्यास भाग पाडले पाहिजे. तसेच सामान्य नागरिकाच्या खिशातून काढलेला हा नफा भाजपच्या निवडणूक निधीसाठी जमा करण्याचे धोरण असावे अशी शंका आहे  -  मुकुंद किर्दत, प्रवक्ता, आप - 

भांडवलदार धार्जिन्या सरकारच्या धोरणांचा कायम विरोध कायम आम आदमी पार्टी करत राहणार -अक्षय शिंदे महासचिव,

निलेश वांजळे,सतीश यादव,शीतल कांडेलकर,निरंजन अडागळे,सय्यद अली,बालाजी कथेकर,निखिल खंदारे,सुशील बोबडे,उमेश बागडे,किरण कांबळे,वैभव टेकाळे,अविनाश भाकरे,शेखर ढगे,अमोल मोरे,गणेश ससाणे,प्रशांत कांबळे,अनिल कोंढाळकर,संतोष काळे,गजानन भोसले,ऋषिकेश मारणे,विशाल जाधव.सुनील सवडी,बालाजी कांठेकर,प्रीतम कोंढाळकर,किरण कद्रे,

Post a Comment

Previous Post Next Post