मुस्लिमांचा वापर फक्त मतांसाठी करू नका त्यांना सत्तेत भागीदारी द्या. अब्दुर रहमान ( विशेष पूर्व पोलीस महानिरीक्षक )

Don't use Muslims just for votes give them a share in power.Abdur Rahman (Special Inspector General of Police East)


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे कसबा पेठ कागदीपुरा मुख्तार शेख यांच्या मुख्य कार्यालय या ठिकाणी विविध मुस्लिम धर्मगुरू, धर्मनिरपेक्ष इंडिया आघाडी घटक पक्षात काम करणार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मुस्लिम राजकीय मंचाच्यावतीने "चिंतन बैठक" बैठक संपन्न झाली. या चिंतन बैठकीच्या अध्यक्षपदी पूर्व विशेष पोलीस महानिरीक्षक अब्दुल रहमान होते.

सदर बैठकीत पुणे शहरातील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे व इतर घटक पक्षाचे अनेक मुस्लिम आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

पूर्व विशेष पोलीस महानिरीक्षक अब्दुल रहमान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मुस्लिमांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढणे गरजेचे आहे. महाआघाडीतील नेते मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर करून घेतात मात्र सत्तेत मुस्लिमांना भागीदारी देत नाही. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी भरभरून मतदान दिले. महाराष्ट्रात एकूण 48 पैकी एकही उमेदवार लोकसभेत दिले नाही.  मोदी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जितका मतदान मुस्लिमांनी केला व मुस्लिम समाजाची यावेळी मतदानाची टक्केवारी ही लक्षणीय वाढ झाली होती. मुस्लिमांचा ते योगदान आघाडी सरकारने विसरता कामा नये. त्याची भरपाई येणाऱ्या काळात आघाडीतील घटक पक्षाने करणे गरजेचे आहे. मात्र या लढाईत महाआघाडीचे घटक पक्ष कमी पडल्याचे दिसून येते त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारांना पाडण्याचा काम केले मुस्लिम समाजाने यावेळी वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्ष पर्याय असताना सुद्धा त्यांना पसंती न देत महाविकास आघाडीला प्रथम पसंती दिली. असे असताना सुद्धा 

नुकताच विधान परिषदेचे दोन जागा मुस्लिमांचे रिकाम्या झाल्या त्याही ठिकाणी मुस्लिमांना संधी देण्यात आली नाही यावरून असे सिद्ध होते की महाविकास आघाडी फक्त मुस्लिमांचा मतांसाठी वापर करून घेते मात्र सत्तेत भागीदारी देत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ताकतीने आपले उमेदवार उभा करून स्वतःच्या बळावर व इतर समाजाचा साथ सहयोग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावा आणि आपली ताकत दाखवावी असे आव्हान पूर्व विशेष पोलीस महानिरीक्षक मा. अब्दुल रहमान यांनी आजच्या झालेल्या चिंतन बैठकीत व्यक्त केले.

मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने आजच्या चिंतन बैठकीत झालेल्या खालील ठराव वाचून उपस्थित असलेल्या पुणे शहरातील आजी-माजी नगरसेवक धर्मगुरू सामाजिक कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव मंजूर केले. 

ठराव क्रमांक 1

2024 नुकताच झालेल्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 पैकी एक ही मुस्लिम उमेदवार न दिल्याने व तसेच विधान परिषदेतील 2 मुस्लिम उमेदवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्या ठिकाणी पुन्हा मुस्लिमांना संधी दिली पाहिजे होते मात्र तसे न करता पूर्णपणे मुस्लिम समाजाला डावलण्यात आले व सध्याची असलेली विधान परिषद मुस्लिम मुक्त केल्याने आम्ही इंडिया आघाडीवर तीव्र नाराजी ने व्यक्त करीत आहोत. 

ठराव क्रमांक 2

पुणे शहर व जिल्ह्यात असलेल्या 21 मतदार संघापैकी आगामी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये किमान 2 विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना इंडिया आघाडी व घटक पक्षाने अधिकृत उमेदवारी देण्यात यावी

ठराव क्रमांक 3

पुणे शहर व जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहे. त्यापैकी पुणे शहरात 8 मतदार संघातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरू, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचा लवकरच पुण्यात महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे ठरले आहे.

ठराव क्रमांक 4

आगामी विधानसभा महाराष्ट्र निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ इंडिया आघाडीचे सर्व नेत्यांना व घटक पक्षांना लवकरच भेट घेऊन मुस्लिमांच्या प्रतिनिधित्व बाबत चर्चा करण्यात येणार आहे. 

ठराव क्रमांक 5

मुस्लिम समाजाला, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पक्ष पतळीवर लोकसंख्या नुसार महाराष्ट्रात प्रतिनिधित्व देण्यात यावी.

असे एकूण आज 5 ठराव आजच्या बैठकीत एका मताने व सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आले आहे.

चिंतन बैठकीचा प्रस्ताविक 

माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची भूमिका व उद्दिष्ट या विषयावर सविस्तर माहिती सीनियर अडवोकेट शाहिद अख्तर यांच्या वतीने मांडण्यात आले.

बैठकीतील मंजूर झालेल्या ठराव इब्राहिम खान यांनी सादर केले. कार्यक्रमचा सूत्रसंचालन अंजुम इनामदार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अमिन शेख व आभार प्रकटन नदीम मुजावर यांनी केले.

सदर झालेल्या चिंतन बैठकीत 

पुणे मनपा मा. स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख, गफूर पठाण, माजी नगरसेवक हाजी फिरोज शेख रईस सुंडके, मा. नगरसेविका हसीना इनामदार, माजी नगरसेविका बेबी युसुफ, माजी नगरसेवक एडवोकेट आयुब इलाही बक्ष, इम्तियाज तांबोळी, मुस्लिम बँकाचे डायरेक्टर समीर शेख, सईद सय्यद, इकबाल शेख, बबलू सय्यद, तसेच सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख, रहीमउद्दीन शेख, फिरोज मुल्ला,  फिरोज तांबोळी, असलम पटेल, अली मुलानी. असे इत्यादी पुणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते 


 

प्रसिद्धीप्रमुख 

मुक्तार शेख , माजी नगरसेवक

चिंतन बैठकीतील इतर फोटो व व्हिडिओ साठी संपर्क करा 

अंजुम इनामदार 9028402814

Post a Comment

Previous Post Next Post