एका महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला

 


पुणे न्यूज एक्सप्रेस :

पुण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  एका महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या प्रियकराने आपल्या मित्रासह महिलेचा मृतदेहच नाही तर तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत फेकल्याची घटना पुण्यातील मावळ तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखिरे आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक केली आहे. 


तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 25 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रियकर आणि मुख्य आरोपी गजेंद्र दगडखिरे याने गर्भपातासाठी मुंबई जवळील ठाण्यात पाठवले असता तिचा मृत्यू झाला होता. 


अधिकाऱ्याने सांगितले की, "9 जुलै रोजी परतत असताना दगडखिरे आणि त्याचा सहकारी रविकांत गायकवाड यांनी तळेगावजवळील इंद्रायणी नदीत महिलेचा मृतदेह फेकून दिला. तिची दोन आणि पाच वर्षांची मुले रडायला लागली तेव्हा त्यांनी त्यांनाही नदीत फेकून दिले." महिलेने पतीपासून विभक्त होऊन दगडखरे सोबत शारीरिक संबंध ठेवले होते, त्यामुळे ती गर्भवती राहिली होती, असे पोलिसांनी सांगितले की, ही महिला पतीपासून विभक्त होऊन मुलांसह आईकडे राहायला आली होती. महिलेच्या आईने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला असून तांत्रिक पुराव्याच्या आधारे दगडखिरे आणि गायकवाड यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


अधिकारी म्हणाले, "महिला आणि दोन मुलांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. दगडखिरे आणि गायकवाड यांना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."

Post a Comment

Previous Post Next Post