पुणे मनपा सार्वजनिक शौचालयात महिलांची आर्थिक पिळवणूक

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे मनपाच्या स्वछता गृहांमध्ये महिलांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्या संदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांना निवेदन देण्यात आले. 

पुणे महानगरपालिकेने शहरामध्ये अनेक निःशुल्क स्वछतागृह ( शौचालये ) उभारली असून त्याच्या वापरासंदर्भात महिला आणि पुरुष यांमध्ये भेदभाव केला जात आहे , पुरुषांना मोफत आणि महिलांकडून ५ ₹ ची मागणी केली जाते पैसे नसल्यास अडवणूक केली जाते हा भेदभाव कश्यासाठी ? 

  महिलांना वेगळा न्याय आणि पुरुषवर्गाला वेगळा न्याय करणारी महानगर पालिका ही आजही स्वतंत्रपूर्व काळातील कायद्यांवर चालू आहे का ? , देशात संविधानाप्रमाणे  महिला पुरुष यांना समान कायदा असताना स्वछतागृह वापरण्यावरून भेदभाव करणाऱ्या पुणे महानगर पालिकेचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उपशहर संघटिका  ज्योती चांदेरे यांनी निषेध केला. 

   शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवेदन देत पुणे मानपाला सात दिवसाच्या आत या शहरातील सर्व स्वछतागृह चालकांना , संबंधीत अधिकारी वर्गाला आदेश देऊन महिला वर्गाला न्याय द्यावा अन्यथा शिवसेना पद्धतीने आम्ही सर्व स्वच्छता गृहांवर आंदोलन करून मनपाच्या महिलांवरील अत्याचाराविषयी वाचा फोडू याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हण्यात आले आहे .

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त यांस निवेदन देताना ज्योती चांदेकर शिवसेना महिला उपशहर संघटिका कोथरुड , सोनाली जुनवणे उपविभाग संघटक शिवाजी नगर विधानसभा , अश्विनी मल्हारे कसबा विधानसभा महिला आघाडी या उपस्थित होत्या . 

यावेळी अतिरिक्त आयुक्त यांनी सदर तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश प्रशासना दिले आणि महिला आघाडी पदाधिकारी यांकडून सदर सार्वजनिक शौचालयाची माहिती मागवून घेतली . 



Post a Comment

Previous Post Next Post