प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पो उलटून पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी दिसून येत आहेत.
हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ - मृदंगाचा गजर आणि माऊली - तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. दोन्ही पालखीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता. यातले वीस वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना घडली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. पाचही वारकऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आलं आहे.