प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: मनोहर भिडे नाव असलेल्या विकृत माणसाने वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पुजा करताना महिलांनी काय नेसावे किंवा काय नेसू नये याबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आहे असे बोंबलणाऱ्या मनोहर भिडे च्या विरोधात त्याच्या प्रतिमेस काळे फासुन चप्पल मारो आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज फडके हौद, कसबा पेठ, पुणे येथे करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘मनाहेर भिडे यांनी कर्तत्ववान महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी करून महिला वर्गाचा अपमान केला आहे. वारंवार भिडे महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये करीत आहे आणि सरकार डोळेझाक पणाचे सोंग घेत आहे. भिडेचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढले पाहिजे. त्याचबरोबर देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे दळभद्री आणि हांडग आहे असे बालून शहिदांचा अपमान केला आहे. या बद्दल जर मिंदे सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मनोहर भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.’’
यानंतर उपस्थित महिलांनी मनोहर भिडे यांच्या प्रतिमेस चप्पलने मारून निषेध व्यक्त केला.
यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह मा आमदार दिप्तीताई चवधरी, माजी महापौर कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, नगरसेविका लताताई राजगुरू, नगरसेवक अजित दरेकर, नगरसेवक दत्ता बहिरट, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ, ज्येष्ठ नागरिक संघाचे द. स. पोळेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, अर्चना शहा, उषाताई राजगुरू, सुंदरताई ओव्हाळ, छाया जाधव, सीमा सावंत, प्रियांका मधाले, अनुसया गायकवाड, वैशाली रेड्डी, प्राजक्ता गायकवाड, ॲड रेशमा शिकलगार, नलीनी दोरगे, तृप्ती शेंडगे, सुरेखा काची, सायली गाडे, देविदास लोणकर, संजय डोंगरे, फिरोज शेख, हर्षद हांडे, मुन्नाभाई खंडेलवाल, शिवराज भोकरे, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिल पवार, राज घेलोत, नरेश नलावडे, बंडु शेडगे, गीता तारु, पुणे शहर सोशल मीडिया प्रमुख गुलामहुसेन खान व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.